धामणी (ता.आंबेगाव) येथे म्हाळसाकांत यात्रोत्सवाच्या निमित्ताने उत्साहात पार पडल्या कुस्त्या!!

धामणी (ता.आंबेगाव) येथे म्हाळसाकांत यात्रोत्सवाच्या निमित्ताने उत्साहात पार पडल्या कुस्त्या!!
धामणी (ता.आंबेगाव) येथे श्री म्हाळसाकांत खंडोबा यात्रेनिमित्त कुस्त्यांचा जंगी आखाडा भरविण्यात आला.या आखाड्यात १०१ते ५००१ रुपयांपर्यंत पैलवानांना बक्षिसे देण्यात आली.
या आखाड्यात आंबेगाव तालुक्यासह मावळ,मुळशी,खेड,जुन्नर, शिरूर,पारनेर,भोसरी, संगमनेर,श्रीगोंदा येथील नामवंत पैलवानांनी हजेरी लावली.या कुस्त्यांच्या आखाड्यात सुनिल दादा जाधव,भरत तांबे, शरद जाधव,संजीव गाढवे यांनी पंच म्हणून काम पाहिले.
यावेळी सरपंच रेश्मा बोऱ्हाडे, उपसरपंच अक्षय विधाटे,ग्रामपंचायत सदस्य सुरेखा रोडे,प्रतिक जाधव,डॉ.अशोक पगारीमा,मा. सरपंच सागर जाधव,अंकूश भूमकर, पहाडदरा सरपंच मच्छिंद्र वाघ,ज्ञानेश्वर विधाटे,बापूसाहेब काचोळे,भगवान वाघ,वामन जाधव,रामदास जाधव,किसन वाघ,अविनाश बढेकर,अजित बोऱ्हाडे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी महिला पैलवानांनी सुद्धा आखाड्यात आपली झलक दाखविली.
यावेळी राष्ट्रीय ग्रामिण शिक्षण संस्थेच्या संचालिका पूर्वा दिलीप वळसे पाटील व भीमाशंकर साखर कारखान्याचे मा.चेअरमन देवदत निकम, संचालिका पुष्पलता जाधव यांच्या हस्ते पै.श्रेया होळकर व सिध्दी होळकर या बहिनींची कुस्ती लावण्यात आली. हि महिला कुस्ती आखाड्याचे आकर्षण ठरली.
धामणी (ता.आंबेगाव ) येथे श्रेया होळकर व सिद्दी होळकर यांची कुस्ती लावताना पूर्वा दिलीप वळसे पाटील व मान्यवर