धामणी (ता.आंबेगाव) येथील भैरवनाथ मंदिरात भराड गोंधळाचे घट सोहळा संपन्न!!

धामणी (ता.आंबेगाव) येथील भैरवनाथ मंदिरात भराड गोंधळाचे घट सोहळा संपन्न!!
धामणी (ता.आंंबेगाव) येथील पुरातन श्री भैरवनाथ मंदिरात चैत्र शुध्द चतुर्दशी शुक्रवारी (११ एप्रिल २५) रोजी पाच नामाचे भराड गोंधळाचे घटाचा कार्यक्रम सदानंदाचा येळकोट,भैरवनाथाचे चांगभले,अंबाबाईचा उदे उदे!! असा जयघोष करुन,भंडारा उधळून मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याचे भैरवनाथ देवस्थानाचे सेवेकरी समस्त रोडे मंडळीनी सांगितले.
दरवर्षी चैत्री पौर्णिमेच्या अगोदरच्या दिवशी धामणी येथील या भैरवनाथ मंदिरात समस्त रोडे व जाधव पाटील मंडळीच्या वतीने भैरवनाथाचे भराडाचे घट बसवून त्या ठिकाणी भराड्याकडून भैरवनाथाचे पाच नाम भराड गोंधळ घालण्यात येतो
यावेळी सुनंदा रोडे,सुमन रोडे,अरुणा रोडे,सुनिता रोडे,कमल रोडे,रोहीणी रोडे.,लता रोडे,सुरेखा रोडे,आशाबाई रोडे,बबूबाई रोडे,रंजना रोडे,अंजना आबा रोडे,अंजना पांडुरंग रोडे यांच्यासह महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
पूर्वीपासून चालत असलेली पाच नामाच्या भराड गोंधळाची परंपरा रोडे व जाधव जथेकर्यांनी जपलेली आहे. फार पूर्वीपासून चंपाषष्ठीला खंडोबाचे पाच नामाचे जागरण करण्याची परंपरा आहे.त्याप्रमाणे येथील भैरवनाथ मंदिराचे आवारात चैत्र चर्तुदशीला भराड घटाला मंदिराचे आवारात खूप गर्दी होऊन जागा पुरत नसायची.आता रोडे,जाधव आडनावाच्या मंडळीनी ही प्रथा सुरु ठेवलेली आहे असे जुन्या मंडळीनी सांगितले.पुरातन भैरवनाथ मंदिराच्या घाटाच्या बाजूकडील संरक्षक भिंतीचे काम सुरु असून उर्वरीत संरक्षक भिंतीचे व शिखराचे रंगभरणीचे व संपूर्ण आवारात फरशी बसविण्याचे काम पुढील चैत्र पोर्णिमेपर्यत लोकवर्गणीतून पूर्ण करण्याचा संकल्प यावेळी ग्रामस्थांनी केला.यावेळी मंदिराचे व्यवस्थापक रोडे मंडळीनी यावेळी सांगितले.
यावेळी कैलास रोडे,आबासाहेब रोडे,गोपाळ रोडे सर,शांताराम रोडे,निलेश रोडे,अक्षय रोडे,सुहास रोडे,किसनराव रोडे,सुरेश रोडे,चंद्रकांत रोडे,जयसिंग रोडे,विकास रोडे,बबन रोडे,काळूराम रोडे व ग्रामस्थ उपस्थित होते.