अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जवळे (ता.आंबेगाव) ग्रामपंचायतला आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार प्रदान!!

अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जवळे (ता.आंबेगाव) ग्रामपंचायतला आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार प्रदान!!
अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतीला या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.यामध्ये आंबेगाव तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायत जवळे यांना आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार मिळाला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे,डॉक्टर मगर साहेब (जेष्ठ कृषी जलतज्ञ),चंद्रकांत दळवी साहेब (मा.सनदी अधिकारी) विजयसिंह नलावडे साहेब, (उपमुख्य कार्य अधिकारी जिल्हा परिषद पुणे) राहुल दादा कुल (आमदार दौंड विधानसभा) प्रदीप दादा कंद (जिल्हा परिषद मा.अध्यक्ष) व सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी,सरपंच परिषदेचे प्रदेश सरचिटणीस विवेक ठाकरे या सर्वांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.यामध्ये भव्य ट्रॉफी,भारतीय संविधान, ग्रामगीता व वडाचे एक रोप सन्मान म्हणून भेट देण्यात आले.
हा पुरस्कार जवळे गावचे आदर्श सरपंच सौ.वृषालीताई उत्तम शिंदे पाटील,सौ.मनीषा टाव्हरे (उपसरपंच) चंद्रकला गायकवाड, संगीता साबळे, अंगणवाडी सेविका शालन सोनवणे,संगीता वाळुंज ,संगणक परिचालीका सुजाता पोखरकर, ग्राम रोजगार सेवक भूपेंद्र वाळुंज, ग्रामपंचायत अधिकारी शीला साबळे यांनी गावच्या वतीने स्वीकारला.
यावेळी आंबेगाव पंचायत समितीचे सागर कांबळे साहेब उपस्थित होते.त्याचप्रमाणे आंबेगाव पंचायत समितीच्या कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज मॅडम व विस्तार अधिकारी हुजरे साहेब यांनी जवळे ग्रामपंचायतला मिळालेल्या आदर्श गाव पुरस्काराबद्दल फोन वरून शुभेच्छा दिल्या.
यावेळी सरपंच सौ.वृषाली शिंदे यांनी बोलताना सांगितले की,गावामध्ये केलेली विकास कामे यामध्ये मिळालेले सर्व सदस्यांचे योगदान,सर्व ग्रामस्थांचे योगदान, सर्व शासकीय कर्मचारी ,अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी व आंबेगाव पंचायत समितीचे सर्व अधिकारी यांचे आभार मानले.कारण काम करत असताना सर्वांना सोबत घेऊन काम करावे लागते व सर्वांनी एकत्रित केलेल्या कामाचा ठसा हे आज आदर्श गाव पुरस्कार मिळाल्याने सर्वांचे साक्षीने उमटलेला आहे हा पुरस्कार जवळे ग्रामस्थांना समर्पित करण्यात येतो.