पंचायत समिती अंबरनाथ येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केली कामकाजाची पहाणी!!

पंचायत समिती अंबरनाथ येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केली कामकाजाची पहाणी!!
दि.03 (जिल्हा परिषद, ठाणे) – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.)अविनाश फडतरे, व उपमुख्य कार्यकारी अधिाकरी,(ग्रा.पं.) प्रमोद काळे, यांनी पंचायत समिती, अंबरनाथ येथील कामकाज पाहणी करिता दि. 01.04.2025 रोजी येथे अचानक भेट दिली.
सन 2017-18, व सन 2022-23 या कालावधीतील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या दप्तर तपासणीची निरिक्षण टिपणी वाचन व सन 2018-19 या कालावधीची उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.), यांनी केलेल्या दप्तर तपासणीची निरिक्षण टिपणी वाचन करण्यात येऊन मार्गदर्शन केले. या निरिक्षण टिपणीमधील त्रृटींची पुर्तता तात्काळ करण्याबाबत सुचना दिल्या तसेच पंचायत समिती, अंबरनाथ अंतर्गत सर्व विभाग प्रमुख यांचा शासकीय योजनांबाबत आढावा घेण्यात आला, शासकीय योजनांची अंमलबजावणीसंदर्भात मार्गदशन व सुचना केल्या.
तसेच शासनाच्या 100 दिवस कृतिआराखडा कार्यक्रमांतर्गत करावायाच्या कामाकाजासंदर्भात सविस्तर आढावा घेऊन मार्गदर्शन केले. दिनांक 14 एप्रिल,2025 पर्यंत कामकाज पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या. टिपणी वाचनाच्या वेळी गट विकास अधिकारी (उ.श्रे.) पंडित कौरु राठोड, सर्व तालुकास्तरीय विभाग प्रमुख, सर्व अधिकारी व कर्मचारी पंचायत समिती, अंबरनाथ उपस्थित होते.
यानंतर नेवाळी ग्रामपंचायत येथे भेट देऊन घनकचरा व्यवस्थापनबाबत प्रत्यक्ष जागेवर जाऊन पहाणी केली व मार्गदर्शन केले. तसेच घनकचरा व्यवस्थापनाबाबत जागेची पहाणी केली. तसेच नेवाळी ग्रामपंचायत मधील प्रधान मंत्री आवास योजनेचे लाभार्थी पंढरिनाथ गजानन म्हात्रे यांच्या बांधकाम सुरु असलेल्या घरकुलास भेट दिली.