समर्थ पॉलिटेक्निकला राष्ट्रीय स्तरावरील मानांकन !!एन.बी.ए.मानांकन करणारे उत्तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिले खाजगी तंत्रनिकेतन !!


पंचनामा बेल्हे प्रतिनिधी – समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ पॉलिटेक्निक,बेल्हे (बांगरवाडी) या तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे नुकतेच नॅशनल बोर्ड ऑफ एक्रीडीशन (एन.बी.ए.) या राष्ट्रीय पातळीवरील समितीकडून पाहणी करण्यात आली व पाहणीमध्ये संस्थेचे कामकाज उत्कृष्ट वाटल्याने एन बी ए कडून सन २०२८ पर्यंत कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग,इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमाना मानांकन करण्यात आले अशी माहिती संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी दिली.
एन.बी.ए. समितीमध्ये चेअरमन म्हणून नवी दिल्लीच्या प्रोफेसर डॉ. प्रेरणा गौर,मध्यप्रदेश चे डॉ.डी.एस.भिलारे,गुजरात चे डॉ.कौशिक पटेल आदींचा समावेश होता.
यापूर्वी २०२२ ते २०२५ या कालावधी करता समर्थ पॉलिटेक्निकला एन बी ए चे मानांकन प्राप्त झाले होते आणि आता २०२८ पर्यंत एनबीएचे पुनश्च मानांकन प्राप्त झालेले आहे.
एन बी ए समितीने समर्थ पॉलिटेक्निक मध्ये उपलब्ध असलेल्या सर्व सुविधा त्याचबरोबर अध्ययन-अध्यापन प्रक्रिया,रिसर्च ऍण्ड कन्सल्टन्सी,भौतिक सुविधा,विद्यार्थ्यांचा फिडबॅक,आउट कम बेस्ड एज्युकेशन,सीओ-पीओ मॅपींग,प्लेसमेंट याचे मूल्यमापन केले.त्याचबरोबर कार्यशाळा,ग्रंथालय,अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा,ऑफीस,जिमखाना,कॅन्टीन,क्रीडा विभाग,मुलांनी केलेले प्रोजेक्ट,कॉम्प्युटर,मेकॅनिकल,इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग व सायन्स विभागाचे लॅब यांची पाहणी केली.तसेच महाविद्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या बस सुविधा,हॉस्टेल सुविधा,उद्योग व्यवसायाच्या समन्वयाने उभारलेल्या प्रयोगशाळा,आऊटडोअर व इंडोअर क्रिडांगणे या सुविधांवरती समाधान व्यक्त केले.
समर्थ पॉलिटेक्निक मध्ये कॉम्प्युटर इंजिनीरिंग,इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग,मेकॅनिकल इंजिनिअरिंग,सिव्हिल इंजिनिअरिंग,मेकाट्रॉनिक्स,इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इ.अभ्यासक्रम शिकवले जातात.
गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षण व विद्यार्थी-शिक्षक-पालक यांच्यामधील सुसंवाद यामुळे संस्थेने प्लेसमेंट,उत्कृष्ट निकाल,शासकीय,अशासकीय,खाजगी शिष्यवृत्ती,सेमिनार,औद्योगिक सहली,तज्ञ मार्गदर्शन,ऑनजॉब ट्रेनिंग,इंटर्नशिप प्रोग्रॅम यांसारख्या इ.उपक्रमांचे या समितीने कौतुक केले. विशेष करून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना नोकऱ्या प्राप्त होत आहेत याचा समितीने विशेष उल्लेख करत सर्वांचे कौतुक केले.
मूल्यांकन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्राचार्य अनिल कपिले,प्रा.संजय कंधारे,एन.बी.ए.समन्वयक प्रा.श्याम फुलपगारे,प्रा.नंदकिशोर मुऱ्हेकर,प्रा.संकेत विघे,सर्व विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहल ताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत तसेच संकुलातील सर्व प्राचार्य,विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्वांचे अभिनंदन केले व भावी वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
