आदर्शगाव गावडेवाडीच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही!! मा. मंत्री वळसे पाटील व मा.खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांची ग्वाही !!


पंचनामा अवसरी प्रतिनिधी – आदर्शगाव गावडेवाडीकरांचा एकोपा व एकजूट कौतुकास्पद आहे .या गावात दोन कोटी ९० लाख ५० हजार रुपयांचा विकास कामांचे उद्घाटन संपन्न झाले आहे.मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांचे या विकास कामात मोठे योगदान आहे प्रलंबित कामासाठी विकास निधी उपलब्ध करून दिला जाईल व या आदर्श गावाला या पुढील काळात विकास कामासाठी कसलाच निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही मा. सहकार मंत्री व आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधी दिलीप वळसे पाटील यांनी दिली.गावडेवाडी येथे विविध विकास कामाचे उद्घाटन वळसे पाटील व मा. खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी भैरवनाथ मंदिर सभागृहात झालेल्या सभेत वळसे पाटील गावडेवाडी करांना संबोधित करत होते.

यावेळी पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची मा.व्हाईस चेअरमन माऊली गावडे,संचालक शांताराम हिंगे,संचालक आनंदराव शिंदे,संचालक मच्छिंद्र गावडे, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष विष्णू काका हिंगे,मा.नगरसेवक रमेश शिंदे, बाजार समितीचे सभापती निलेश थोरात, भाजपचे पुणे जिल्हा सरचिटणीस डॉ.ताराचंद कराळे,सचिव प्रमोद बाणखेले, ऋषिकेश गावडे ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष गावडे,मा.उपसरपंच सुनील बाणखेले, शिवाजीराजे राजगुरू, हिरकणी विद्यालयाचे संचालक संजय पिंपळे ,जगदीशशेठ पिंपळे, सोसायटीचे मा.चेअरमन रवींद्र रघुनाथ गावडे, पांडुरंग गावडे ,उपसरपंच राजेंद्र गावडे ,तंटामुक्तीचे अध्यक्ष राजू गावडे व ग्रामस्थ बहुसंख्येने हजर होते.

सुरुवातीलाच हिरकणी विद्यालयात व शंकरराव पिंपळे (आण्णा) यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून वळसे पाटील व आढळराव पाटील यांच्यासह उपस्थितांनी अभिवादन केले.त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमीक शाळेच्या मंजूर झालेल्या चार वर्ग खोल्यांचे भूमिपूजन वळसे पाटील व मा. खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

भैरवनाथ मंदिर सभागृहात झालेल्या समारंभात सरपंच विजय गावडे, कौस्तुभ शिंदे ,मा. सरपंच देवराम गावडे, डॉ.ताराचंद कराळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन आंबेगाव शेतमाल प्रक्रिया संस्थेचे संचालक औदुंबर कोकणे तर आभार प्रदर्शन मच्छिंद्र गावडे यांनी केले.
