आरोग्य व शिक्षणसामाजिक

संदीप कडलग यांच्या ” वादळ ” कादंबरी चे प्रकाशन !!

पंचनामा संगमनेर प्रतिनिधी – लेखक संदीप कडलग यांच्या ” वादळ ” या नवीन मराठी कादंबरी चा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. स्वयं प्रकाशन, पुणे च्या वतीने ही कादंबरी प्रकाशित करण्यात आली.
इगतपुरी येथील सॅमसोनाइट साऊथ आशिया प्रा. लिमिटेड गोंदे येथे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रमण्यम दत्ता यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी कार्यकारी संचालक रमेश तैनवाला, उपाध्यक्ष वाय.एम. सिंग, नूतन उपाध्यक्ष पंकज चावला, मार्क्सवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. डी. एल. कराड, मुंबई मुख्य कार्यालयाचे आर्थिक सल्लागार जे. के. मेनन आदिंच्या उपस्थितीत संपन्न झाला.
लेखक संदीप कडलग हे इगतपुरी येथे कंपनी मध्ये कार्यरत असून ते निमगाव भोजापूर ता. संगमनेर येथील मूळ रहिवाशी आहेत. संदीप कडलग यांची लेखक म्हणून पहिलेच लेखन आहे. वादळ ही मराठी कादंबरी १४६ पानी असून, प्रबोधनपर असून स्रिया चे महत्व विषद करणारी आहे. कडलग हे नाटकात ही अभिनय करत आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ अतिशय सुंदर बनविले आहे.


“सुनबाई तू उशीर केलास सांगायला. चल तू आटोप पटकन, घेऊन चल मला त्याच्या ऑफिसमध्ये. माझ्या घरात वादळ आणणारी कोण ही सटवी आहे बघतेच मी!” म्हणून दोघीही रिक्षात बसल्या. गर्दीतून मार्ग काढीत, वळणे घेत रिक्षा एका दरवाज्यात उभ्या असलेल्या रखवालदाराजवळ उभी राहिली.
पुढे कुठले वादळ निर्माण झाले? ते शमले की सगळे उद्ध्वस्त करून गेले?
…. वादळ कादंबरी

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.