नाते कलेचे माझ्या रक्ताशी!! विशेष लेख – अष्टपैलू कलावंत श्री. आवळे मास्तर


आवळे मास्तरांचे संपूर्ण नाव कोंडीराम लक्ष्मण आवळे मु.
पो.जांब,ता.वाई,जि.सातारा
लहानपणापासूनच कलेचा छंद होता, यांच्या कलेचा प्रकार म्हणजे वगनाट्यातील व्हिलन,नायक,सरदार, इत्यादी भूमिका करणारे ते एक अष्टपैलू कलावंत आहेत.
ते स्वतः लेखक आणि,दिग्दर्शकही आहेत ….
त्यांनी तमाशा रंगभूमीवर आपले संपूर्ण आयुष्य वेचले…..शेकडो कलावंत घडविले. सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक, रजवाडी ,कौटुंबिक वगनाट्यमध्ये व्हीलन आणि नायक या भूमिका करून लाखो लोकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले!!
अनेक वगनाट्य स्वतः लिहिली.त्यांनी लिहिलेल्या वगनाट्या ने रसिकांच्या मनात घर करून ठेवले.ते कायमचेच……. आणि समाज प्रबोधनही केले.महाराष्ट्रातील अनेक नामवंत तमाशा फडात काम करून, संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपले नाव पेरून ठेवले.आजही त्यांचे वय 80 वर्षाचे आहे.तरीसुद्धा स्टेजवर रसिकांची सेवा करतात हे मोठे नवलच!!
खरंच समुद्रामध्ये काही शिंपल्यातच अनमोल मोती सापडतात. त्याचप्रमाणे आपल्या भारतभूमीच्या मातीत आवळे मास्तरासारखे कलावंत जन्माला आले. हे आपल्या रसिकांचे एक मोठे भाग्य म्हणावं लागेल. त्यांना एस.टी खात्यामध्ये नोकरी लागली होती,परंतु त्यांनी ठरवले की, कलेद्वारे मला रसिकांची सेवा करायची आहे. म्हणून त्यांनी ती नोकरी सोडली हे अगदी नक्की. घरातील अनेक अडचणींना तोंड देऊन, ते 80 वर्ष रसिकांची सेवा करीत आहेत. खरंच….. आवळे मास्तरांच्या नसानसात आणि शरीरातल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबा थेंबात कलेचा अंश सामावलेला आहे.
त्यांचा खडतर जीवन प्रवास लिहिण्यास दोन दिवसही अपुरे पडतील यात शंका नाही.शेवटी ते मला म्हणाले की, स्टेजवर रसिकांची सेवा करीत असताना मला मरण आले तर माझ्यासारखा भाग्यवान कोणीच नाही असे मी समजेल…….हे ब्रीदवाक्य त्यांनी मला सांगितलं…. आणि पुढे म्हणाले की आमच्या खानदानी मध्ये एकही माणूस, कलावंत नाही. फक्त मी आणि मीच कलावंत जन्माला आलो .हे माझं भाग्य ……. मास्तर…… तुमच्यासारखांच लिखाण करणं मला मिळालं हे मी माझं परम भाग्य समजतो, मास्तर…… तुमचे पुढील आयुष्य सुखाचं, आनंदाचे जावो, तुमच्या हातून पुन्हा, पुन्हा रसिकांची सेवा घडो, तुम्हाला उदंड आयुष्य मिळो, हीच ईश्वराचरणी प्रार्थना….. तुमच्यासाठी कितीही लिहिले तरी, माझे शब्द अपुरेच ……..
लेखक शाहीर खंदारे.
ता.नेवासा.
8605558432