ई पीक पाहणी मधून हिरड्यांच्या झाडांची नोंद घेण्यात यावी,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन !!


पंचनामा घोडेगाव प्रतिनिधी – हिरड्याच्या झाडाची नोंद साताबारा ला करण्याचा पर्याय कृषी विभागामार्फत ई पीक पाहणी या अप्लिकेशन मधून उपलब्ध आहे. त्याद्वारे हिरडा झाडांची नोंद तातडीने करून घ्यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार आंबेगाव यांना हिरडा झाडाची नोंद सातबारा ला करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
साताबाराला हिरडा झाडाची नोंद व्हावी हि मागणी आदिवासी समाजाच्या वतीने अनेक संघटना व NGO गेल्या अनेक दिवसापासून करत आहेत.कृषी विभागाच्या वतीने ई पीक पाहणी नावाचे अप्लिकेशन असून त्यात अगोदरच बांधवरची झाडे या पर्यायात हिरडा झाडाची नोंद करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.मात्र आदिवासी समाजात या बाबत जनजागृती नसल्याने अनेक शेतकऱ्यांना या बद्दल कोणतीही माहिती नाही. ती नसल्याने आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी नोंद केलेली नाही.
गावातील पोलीस पाटील यांना सहाय्यक म्हणून सदर अप्लिकेशन वर स्वतःचा लॉगिन आयडी दीला आहे. त्याचा वापर करून त्यांनी देखील शेतकऱ्याच्या हिरडा झाडाची नोंद करायची आहे.त्यासाठी आजच्या निवेदनातुन पोलीस पाटील यांची तातडीने मिटिंग बोलावून त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यावी तसेच हिरडा झाडाच्या नोंदी बाबत माहिती होण्यासाठी गावागावत ग्रामसेवक यांच्या मार्फत गावबैठका घेण्यात याव्यात तसेच याबाबतचे माहिती पत्रक छापून ते घरोघरी वाटावे अशी मागणी करण्यात आली आहे.
या वेळी पंचायत समिति आंबेगाव तालुका मा.सभापती संजय गवारी,रामदास वळसे पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे,प्रविण पारधी सहाय्यक प्रकल्प अधिकारी सोनुल कोतवाल,प्रकाश घोलप,दत्ता वाघ, मारुती केंगले,दिनेश गभाले यांनी तहसिलदार संजय नागटिळक,प्रांत अधिकारीगोविंद शिंदे साहेब यांना निवेदन देण्यात आले.
