जवळे (ता.आंबेगाव) येथे उत्साहात संपन्न झाला शिवराज्याभिषेक सोहळा!!


पंचनामा निरगुडसर प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून संपूर्ण राज्यभर ओळख असणाऱ्या जवळे गावात शिवराज्याभिषेक सोहळा शासकीय नियमानुसार उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी स्वराज्यगुढी उभारून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.श्रीफळ वाहून राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करून मानवंदना देण्यात आली.

यावेळी जवळे गावच्या आदर्श सरपंच वृषाली उत्तम शिंदे पाटील यांनी स्वराज्य गुढीचे पूजन व महाराजांचे पूजन केले.यावेळी जवळे विकास सोसायटीचे सचिव सतीश टाव्हरे ,बाळासाहेब निघोट, बाबासाहेब खालकर(संचालक भि.का),नारायण खिलारी ,बाळासाहेब वाळुंज,अमोल शिंदे, साहिल वायकर, श्रीकांत वायकर, संजय शिंदे, सुरेश शिंदे ,विकास बोराटे,अशोक शिंदे ,किसन राजगुरू, तुकाराम गावडे (शेतकरी संघटना) ,मच्छिंद्र लायगुडे (शाहीर),शंकर शिंदे,महेंद्र वाळुंज,यश वाळुंज,अशोक लोखंडे, किशन अभंग,आशा खिलारी,वैशाली वायकर,संध्या वाळुंज आदी मान्यवर उपस्थित होते अशी माहिती शीला साबळे (ग्रामविकास अधिकारी) यांनी दिली.

