आरोग्य व शिक्षणसामाजिक

के.ई.एम.हॉस्पिटलमध्ये समर्थ फार्मसीच्या ९ विद्यार्थ्यांची निवड !!

पंचनामा बेल्हे प्रतिनिधी – के.ई.एम.हॉस्पिटलमध्ये समर्थ फार्मसीच्या ९ विद्यार्थ्यांची निवड !!

हॉस्पिटल फार्मासिस्ट च्या अनेक संधी उपलब्ध-बारिया


समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे या औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल च्या वतीने नुकतेच पूल कॅम्पस ड्राइव्ह २०२५ चे आयोजन करण्यात आले होते.
या कॅम्पस ड्राईव्ह मध्ये फार्मसी च्या अंतिम वर्षातील ६६ विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग दर्शविला.
केईएम हॉस्पिटल पुणे अंतर्गत घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी या दोन्ही औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील ६६ विद्यार्थ्यांची प्रथम फेरीमध्ये लेखी परीक्षेद्वारे निवड करण्यात आली.त्यानंतर वैयक्तिक मुलाखतीच्या फेऱ्या यशस्वीपणे पार केल्या.अंतिम निवडीसाठी के ई एम हॉस्पिटल पुणे येथे मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये महाविद्यालयातील ९ विद्यार्थ्यांची निवड झाल्याची माहिती समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले यांनी दिली.
के ई एम हॉस्पिटल पुणे चे एच आर हेड अर्देशीर बारिया व ईरा जोशी यांनी मुलाखतीची सर्व निवड प्रक्रिया पूर्ण केली.
ट्रेनी हॉस्पिटल फार्मासिस्ट या पदांसाठी सदर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.
निवड झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे:-
समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मधील वैष्णवी दोरगे,ऋतुजा घोलप,वैष्णवी मोरे,धनश्री आरोटे व मेघा काळे यांची तर समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी मधील निकिता सुपेकर,प्रियांका तांबे व चिदानंद कांबळे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ.सागर तांबे व डॉ.बिपीन गांधी यांनी कॅम्पस ड्राईव्ह चे यशस्वी नियोजन करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,विभागप्रमुख डॉ.सचिन दातखिळे,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.