जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जारकरवाडी येथे संपन्न झाला चिमुकल्यांचा आठवडे बाजार!!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जारकरवाडी येथे संपन्न झाला चिमुकल्यांचा आठवडे बाजार!!
शालेय वयात मुलांना व्यवहार ज्ञान समजुन घेता यावे यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जारकरवाडी येथे आनंद मेळावा,आठवडे बाजार आयोजीत करण्यात आला होता. या बाजारात तब्बल २० हजार रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक श्री. काळे सर यांनी पंचनामाशी बोलताना दिली.
दैनंदिन जीवनात विद्यार्थी शालेय शिक्षणात अभ्यास करत असतात. मात्र प्रत्यक्षपने बाहेरच्या जगात वावरत असताना त्यांना व्यवहार ज्ञान होणे गरजेचे असते. कोणताही व्यवहार करत असताना किती पैसे घेतले किती परत केले यामुळे त्यांचे गणित सुधारते. शिवाय एखादी वस्तू विकण्याची अथवा विकत घेण्याची त्यांची मानसिकता तयार होते. हिच प्राथमिकता लक्षात घेऊन असे उपक्रम राबवले जात असल्याचे मुख्याध्यापक श्री.काळे सर यांनी यावेळी सांगितले.
या बाजारात चिमुकल्यांनी विविध प्रकारच्या भाज्या, किराणा दुकानात मिळणारे विविध वस्तू,ओली भेळ, वडापाव,चहा,इडली डोसा,मिसळ , कढी वडा,गुलाबजाम तसेच विद्यार्थ्यांनी परिसरात उपलब्ध असणारे अथवा आपल्या घरच्या शेतात उपलब्ध असणारे कांदे बटाटे,आले,मेथी,कोथिंबीर,भोपळा,कवट,पालक,हरभरा,मिरच्या,नारळ भेंडी, भाजके शेंगदाणे,काकडी,बोरे इत्यादी पालेभाज्या आदी पदार्थ विक्रीसाठी ठेवले होते.
उपक्रम संपन्न झाल्यानंतर शिक्षकांनी सर्व मुलांचे त्यांनी केलेली गुंतवणूक, झालेले विक्री,त्यातून मिळालेला नफा तोटा इत्यादी मुलांचे अनुभव पालकांसमवेत शेअर केले.सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता.बाजार संपल्यानंतर उरलेल्या पालेभाज्या मुलांनी शालेय पोषण आहारासाठी जमा केल्या.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे पालक,ग्रामस्थ अंगणवाडी सेविका, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सर्व सदस्य,विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.