आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

समर्थ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धेमध्ये २८७ प्रकल्प!!

थायलंड आणि फिलिपिन्स विद्यापीठातून ७६ विद्यार्थी व १२ शिक्षक समन्वयकांचा सक्रिय सहभाग!!

समर्थ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धेमध्ये २८७ प्रकल्प!!

थायलंड आणि फिलिपिन्स विद्यापीठातून ७६ विद्यार्थी व १२ शिक्षक समन्वयकांचा सक्रिय सहभाग!!

कौशल्यपूर्ण शिक्षण काळाची गरज:डॉ.दत्तात्रय जाधव सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय पुणे

समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट,बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक प्रकल्प स्पर्धा “सृजन २०२५”चे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेचे उदघाटन तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय पुणे चे सहसंचालक डॉ.दत्तात्रय जाधव यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,समर्थ अभियांत्रिकी विद्यालयाचे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे,रिसर्च इनोवेशन व इंटरनॅशनलाईझेशन सेल चे प्रमुख डॉ.प्रतिक मुणगेकर,पॉलिटेक्निक चे प्राचार्य अनिल कपिले,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,स्पर्धा समन्वयक प्रा.अमोल खतोडे,विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.निलेश नागरे,रा से यो समन्वयक प्रा.भूषण दिघे,सर्व विभागप्रमुख,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने आदी उपस्थित होते.

विशेष अतिथी म्हणून शिनावात्रा विद्यापीठ थायलंड चे इन्स्टिट्यूट ऑफ मल्टीडिसिप्लिनरी पोस्टडॉक्टरल रिसर्च अँड फान्चाईसी प्रोग्रॅमचे उपसंचालक डॉ.सिप्नारोंग तसेच संशोधन विभाग संचालक डॉ.डोरीस,आंतरराष्ट्रीय विभागप्रमुख जुली सिमोन मकरिओला आदि आंतरराष्ट्रीय दर्जाचे तज्ञ मार्गदर्शक उपस्थित होते.

या प्रकल्प स्पर्धेसाठी विविध महाविद्यालयातून तसेच फिलिपन्स व थायलंड देशातून २८७ प्रकल्प आणि १७६७ विद्यार्थी सहभागी झाले होते.विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या कल्पकतेला वाव मिळावा या हेतूने नवनवीन कल्पना,तंत्रज्ञानाची जोड देऊन समाजाभिमुख केलेल्या नवीन कलाकृती आणि यासारखे विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित संकल्पनेचा आविष्कार या कार्यशाळेत दिसून आला.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय पुणे चे सहसंचालक डॉ.दत्तात्रय जाधव म्हणाले की “सृजन २०२५” या इंटरनॅशनल लेव्हल प्रोजेक्ट कॉम्पिटिशन मधून विद्यार्थ्यांची कल्पकता,नवनिर्मिती पाहायला मिळते.दैनंदिन जीवनात आपल्या तांत्रिक कौशल्याचा,शिक्षणाचा उपयोग करून समाजाचे प्रश्न सोडवण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायला हवा.शिक्षण घेत असतानाच कौशल्यपूर्ण शिक्षण ही काळाची गरज असून त्या अनुषंगाने नवनवीन कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात करावीत.इंजिनियर म्हणजे उत्साह,प्रयत्न,ऊर्जा,कार्यक्षमतेचा अखंड स्रोत असून अर्थव्यवस्था बळकट करणारा समाजातील सर्वात जबाबदार घटक म्हणून त्याकडे पाहिले जाते असे डॉ.दत्तात्रय जाधव म्हणाले.

सृजन २०२५ अंतर्गत परदेशातील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्लॅटफॉर्म द्वारे सादर केलेले संशोधनात्मक प्रकल्प ग्रामीण भागातील गरजांची पूर्तता करणारे होते.सदर प्रकल्प सादर करण्यासाठी समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मार्फत आमच्या विद्यार्थ्यांना जे व्यासपीठ आपण उपलब्ध करून दिले आहे त्याबद्दल आम्ही कृतज्ञ असल्याची भावना यावेळी शिनावात्रा विद्यापीठ,थायलंड येथील रिसर्च व पोस्टडॉक्टरल प्रोग्रामचे उपसंचालक डॉ.सिपनारोंग यांनी व्यक्त केली.

प्रकल्प स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे:
इंजिनिअरिंग विभाग:
कॉम्प्युटर,आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग,डाटा सायन्स इंजिनिअरिंग विभाग:
प्रथम क्रमांक-
पार्थ घागरे (एस के एन इंजिनिअरिंग कॉलेज,पुणे )
प्रकल्पाचे नाव-ऍग्री बोट
मानसी भोर (समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट बेल्हे)
प्रकल्पाचे नाव-गॅस पाईप लिकेज सिस्टिम युजिन्ग रोबोट

द्वितीय क्रमांक
वैष्णवी हिंगे (जयहिंद इंजिनिअरिंग कॉलेज कुरण)
प्रकल्पाचे नाव-एआय बेसड सीसीटीव्ही सिस्टिम
पूजा थोरात (शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ओतूर)
प्रकल्पाचे नाव-मेडिसिन सप्लाय चैन युसिंग ब्लॉक चैन टेक

तृतीय क्रमांक-
प्रज्वल अभंग (समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट,बेल्हे)
प्रकल्पाचे नाव-टेक्स्ट टू थ्रीडी मॉडेल
वृषाली साठे (व्ही ऐ इंजिनीअरिंग कॉलेज अहिल्यानगर )
प्रकल्पाचे नाव-एक्सपेन्स ट्रॅकर सिस्टिम

चतुर्थ क्रमांक-
निशिगंधा पिंगट (समर्थ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट,बेल्हे )
प्रकल्पाचे नाव-स्मार्ट क्रॅडल सिस्टिम

कॉम्प्युटर,आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग,डाटा सायन्स-डिप्लोमा विभाग

प्रथम क्रमांक-
सोहम शिंदे (समर्थ पॉलीटेक्निक बेल्हे)
प्रकल्पाचे नाव-ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्शन सिस्टिम

द्वितीय क्रमांक-
गौरव वाळुंज (शासकीय तंत्रनिकेतन अवसरी)
प्रकल्पा चे नाव-ऍग्रीट्रेड कनेक्ट अँप्लिकेशन
तृतीय क्रमांक –
वेद दांगट (जयहिंद पॉलीटेक्निक कुरण)
प्रकल्पा चे नाव-वर्चुअल एटीएम युसिंग थ्री टायर सेक्युरिटी बाय एआय
आदित्य फानवडे (शासकीय तंत्रनिकेतन अवसरी)
प्रकल्पा चे नाव-प्रोटेट हर उमेन सेफ्टी

चतुर्थ क्रमांक
कार्तिक सरकाळे (ढाकणे पॉलिटेक्निक शेवगाव)
प्रकल्पाचे नाव-ए आय व्हॉइस असिस्टंन्स

इंजिनिअरिंग विभाग:
इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग:
प्रथम क्रमांक-
मयूर देशमुख (समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट,बेल्हे )
प्रकल्पाचे नाव :- ऑटोमॅटिक सि व्ही बोट
श्रीकांत फड (समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट,बेल्हे )
प्रकल्पाचे नाव-रिएक्टिव्ह पॉवर कॉम्बिनेशन

द्वितीय क्रमांक –
सिद्धार्थ वाघ (समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट,बेल्हे )
प्रकल्पाचे नाव-आरएफआयडी बेस्ट पोल्युशन कंट्रोल

शुभम येवले (अमृतवाहिनी कॉलेज संगमनेर)
प्रकल्पाचे नाव-सिस्टम वॉलेट पार्किंग सिस्टम युजिंग क्लाऊड.

तृतीय क्रमांक
विवेक शेंडकर (समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट,बेल्हे)
प्रकल्पाचे नाव-ई.व्ही.बॅटरी मॅनेजमेंट

सय्यद साद (विश्वभारती कॉलेज )
प्रकल्पाचे नाव-स्मार्ट ग्लासेस फॉर ब्लाइंड पर्सन

उत्तेजनार्थ
जेरेड बॅरियन,कर्ट एक्सल ग्रीटिंग,किम एड्रियन मनाबन (युनिव्हर्सिटी ऑफ बतांगस,लिपॅसिटी फिलिप्पीनेस)
प्रकल्पाचे नाव-डिझाईन ऑफ डेव्हलपमेंट ऑफ अलर्ट व्ही टू ऑटोमॅटेड रिअल टाइम इमर्जन्सी व्हेईकल डिटेक्शन अँड ट्रॅफिक कॉऊंटिंग सिस्टम)

इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिक कम्युनिकेशन-डिप्लोमा विभाग:-
प्रथम क्रमांक-
अभिषेक नरवडे (शासकीय तंत्रनिकेतन अवसरी )
प्रकल्पा चे नाव-ऑफिस ऑटोमेशन युजिंग इएसपी-३२

लोहट तन्मय (अमृतवाहिनी पॉलिटेक्निक संगमनेर )
प्रकल्पाचे नाव-इंटेलिजंट इंक्लूजर ऑटोमेशन फॉर एअर ब्रेक स्विच पी.एल.सी.अँड एस.सी.ए.पी.ए.)

द्वितीय क्रमांक-
ऋषिकेश रासकर(समर्थ पॉलीटेक्निक बेल्हे)
प्रकल्पाचे नाव-मिरने पोलुशन कंट्रोल सिस्टम अँड इमर्जन्सी अलर्ट सिस्टम

सार्थक रणपिसे(समर्थ पॉलीटेक्निक बेल्हे )
प्रकल्पा चे नाव-इलेक्ट्रिक सिटी जनरेट युजिंग फूटस्टेप

तृतीय क्रमांक
प्रेम भैये (शासकीय तंत्रनिकेतन अवसरी )
प्रकल्पा चे नाव-आय ओ टी बेसेड ऑटोमेटेड हायड्रोपोनिक सिस्टम

अभिषेक झिंजाड (समर्थ पॉलीटेक्निक बेल्हे )
प्रकल्पा चे नाव-अरली फूड डिटेक्टनेशन सिस्टम

इंजिनिअरिंग विभाग:
मेकॅनिकल व सिव्हील इंजिनिअरिंग
प्रथम क्रमांक-
ऍड्रीयन ए बॅटरोनल (युनिव्हर्सिटी ऑफ बतांगस लिपासिटी,फिलीपिन्स )
प्रकल्पाचे नाव-अ कोपरा ड्राइंग टेक्नॉलॉजी अँड परफॉर्मन्स इव्होल्युशन युजिंग इंडक्शन हीटर मोटर कण्ट्रोल सिस्टिम ऍण्ड फरा चेंज मटेरियल

द्वितीय क्रमांक
प्रतीक्षा चासकर (समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट बेल्हे )
प्रकल्पाचे नाव-अनालिसिस ऑफ वेस्ट वॉटर ट्रीटमेंट फॉर समर्थ हॉस्टेल अँड इंजिनियरिंग बिल्डिंग
अभिजित नागरे (समर्थ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट बेल्हे)
प्रकल्पाचे नाव- टु डिझाईन अँड डेव्हलप पेडल अप्पर ट्रेड टर्न स्टील पावर जनरेशन सिस्टम

तृतीय क्रमांक –
विजय कांदळकर (अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग संगमनेर )
प्रकल्पाचे नाव-अँटी ऍक्सिडेंट सिस्टिम फॉर ऑटोमोबाईल

चतुर्थ क्रमांक-
सायली देवाडे (जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनियरिंग कुरण)
प्रकल्पाचे नाव-कन्सेप्चुअल बंगलो डिझाईन

मेकॅनिकल व सिव्हिल डिप्लोमा विभाग:-
प्रथम क्रमांक
प्रदीप राऊत ( के के वाघ पॉलीटेक्निक नाशिक)
प्रकल्पाचे नाव-मल्टीपर्पज रिक्रुटमेंट

द्वितीय क्रमांक-
स्वप्निल चव्हाण (समर्थ पॉलिटेक्निक बेल्हे)
प्रकल्पा चे नाव-एप्लीकेशन ऑफ वेस्ट प्लास्टिक मटेरियल युज इन सॉईल स्टॅबिलायझेशन

तृतीय क्रमांक –
प्रणव लांडगे (अमृतवाहिनी पॉलिटेक्निक संगमनेर)
प्रकल्पाचे नाव-आय ओ टी बेसेंड सीड स्विंग स्प्राइंग रोबोट
प्रफुल खंडागळे (समर्थ पॉलिटेक्निक बेल्हे)
प्रकल्पाचे नाव-ऑटोमॅटिक रेडर मिसाईल लॉन्चर कंट्रोल सिस्टम युनिट

चतुर्थ क्रमांक
शुभम देवकर (अमृतवाहिनी पॉलिटेक्निक संगमनेर )
प्रकल्पाचे नाव-मॅन्युफॅक्चरिंग अँड टेस्टिंग ऑफ वेस्ट प्लॅस्टिक युज इन ब्रिक्स ऍण्ड पेव्हमेन्ट ब्लॉक

सृजन २०२५ ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी स्पर्धा समन्वयक व मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा.अमोल खतोडे,प्रा.सुरेश नवले,इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनियरिंग विभागप्रमुख प्रा.निर्मल कोठारी,कम्प्युटर इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा.स्नेहा शेगर,आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग विभागप्रमुख प्रा.शुभम शेळके,सिव्हिल इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा.अमोल भोर,इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा.विशाल जोशी तसेच सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांनी विशेष परिश्रम घेतले.
सर्व सहभागी विद्यार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रदीप गाडेकर यांनी,प्रास्ताविक प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे यांनी तर आभार प्रा.अमोल खतोडे यांनी मानले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.