राजुरीमध्ये स्वामी समर्थ प्रकटदिन उत्साहात साजरा!!

राजुरीमध्ये स्वामी समर्थ प्रकटदिन उत्साहात साजरा!!
परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या शुभाशीर्वादाने श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरीप्रणित) राजुरी मधील सर्व सेवेकर्यांच्या नियोजनातून श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन उत्सव व भव्य पालखी मिरवणूक सोहळा नुकताच मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.
स्वामी प्रकट दिनाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी ७ ते ९ या वेळेत श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र कथेचे आयोजन केले होते.भगुर रत्न ह.भ.प. गणेश महाराज करंजकर यांनी ही कथा सदर केली.प्रकट दिनाच्या पालखी सोहळ्यात अवर्णनीय उत्साह आणि कमालीची ऊर्जा जाणवली.पालखीचे स्वागत प्रत्येक दारा मध्ये सडा,रांगोळी व पायघड्या घालून करण्यात आले.प्रत्येक सेवेकरी,भाविक आपलं देहभान विसरून श्री स्वामी समर्थ व दिगंबरा दिगंबरा या दिव्य मंत्राच्या जयघोषात मंत्रमुग्ध होऊन नाचत होते.
स्वामी प्रकटदिन व पालखी सोहळ्यात श्री स्वामी समर्थ महाराजांची भूपाळी आरती सकाळी ८ वा. संपन्न झाली.त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर महाभिषेक झाला.सकाळी ७ वाजल्यापासून भाविक सेवेकऱ्यांची दर्शनासाठी सुरवात झाली.कोणी नारळ,कोणी हार तर कोणी पेढे,केळी घेऊन दर्शनासाठी आले होते.सकाळी ९ वाजता १०८ सेवेकऱ्यांच्या उपस्थिती मध्ये हवनयुक्त स्वामीचरित्र पारायण घेण्यात आले.सकाळी १०.३० वाजता नैवेद्य आरती होऊन उपस्थित सेवेकऱ्यांना सेवाकेंद्रातील प्रतिनिधीकडून मार्गदर्शन करण्यात आले.आरती संपन्न झाल्यानंतर स्वामीचारीत्र कथा ११ ते २ यावेळेत संपन्न झाली.कथा संपन्न झाल्यानंतर मांदियाळी प्रसाद दिला गेला.प्रत्येक सेवेकर्यांनी आपल्या घरून पोळी व भाजी आणली होती.आरती अगोदर सर्व प्रसाद एकत्र करण्यात आला.स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवण्यात आला व सर्वांनी तो गोपाळ काल्याचा प्रसाद आवडीने ग्रहण केला.
सायंकाळी पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला.पालखी आणि मिरवणूक सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे बालसंस्कार विभागातील बाल सेवेकऱ्यांनी आणि कार्यरत महिला सेवेकरी यांनी सादर केलेल्या ब्रम्हांड नायकाचे प्राकट्य आणि दुर्गेची नऊ शक्तिरूपे हा जिवंत देखावा हे होते. पालखी पुढे मागे सेवेकरी दोन दोन च्या रांगेत शिस्तबद्धरीत्या दिगंबरा दिगंबरा,श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ म्हणत ठेक्यावर चालत होते.याभक्तिमय वातावरणात महिला फुगडी खेळत होत्या.महिलांनी आपल्या पारंपरिक नववारी साड्या घालून आल्या होत्या.काही महिल्यांच्या डोक्यावर कलश,तुळशीचे वृन्दावन होते.पुरुषांनी नेहरू पैजामा परिधान केला होता.
श्री स्वामी समर्थ महाराजांची नैवेद्द आरती पालखी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक राजुरी येथे घेण्यात आली व केंद्रातील प्रतिनिधी यांनी स्वामी मार्गा विषयी व १८ विभागाचे मार्गदर्शन केले तसेच बालसंस्कार वर्गाबद्दल माहिती देण्यात आली.बालसंस्कार मधील विद्यार्थ्यांच्या सादरीकरणा नंतर भव्यदिव्य पालखी सोहळा होऊन परत पालखी मार्गक्रमण करत त्याच उत्साहात श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात पालखी विसावली आणि महाप्रसाद वाटप होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.