आंबेगाव तालुक्यातील आदर्श गाव गावडेवाडीच्या यात्रेत डीजेला बंदी!!
नियम भंग करणाऱ्यास १०,०००/- रुपये दंड करण्यात येणार ग्रामस्थांचा निर्णय!!

आंबेगाव तालुक्यातील आदर्श गाव गावडेवाडीच्या यात्रेत डीजेला बंदी!!
नियम भंग करणाऱ्यास १०,०००/- रुपये दंड करण्यात येणार ग्रामस्थांचा निर्णय!!
आदर्श ग्राम गावडेवाडी (ता.आंबेगाव) येथील श्री भैरवनाथ देवाची यात्रा गुरुवारी (ता.१७ ) एप्रिल व शुक्रवारी (ता.१८ ) एप्रिल अशी दोन दिवस होणार आहे या यात्रेत बैलगाड्यांच्या भव्य शर्यती होणार आहेत.मात्र या यात्रेत हनुमान मंदिर ते श्री भैरवनाथ मंदिर या परिसरात डीजे लावून मिरवणूका काढणार्यांवर बंदी घालण्यात आली आहे. नियमभंग करणाऱ्यास दहा हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे यात्रा कमिटीच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले.
पाडव्यानिमित्त पांडुरंग मंदिरात रविवारी ( ता.३०) रोजी यात्रा नियोजनाची बैठक संपन्न झाली.या बैठकीला सरपंच विजय गावडे,उपसरपंच राजेंद्र गावडे,भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मच्छिंद्र गावडे,माजी उपाध्यक्ष माऊली गावडे ,नामदेव गावडे पाटील, सुरेश भिकाजी गावडे, सुरेश भिकाजी भोर,प्रकाश आबा गावडे, सोसायटीचे सचिव सोमनाथ गावडे, हर्षवर्धन शिंदे ,कौस्तुभ शिंदे, बाळा लंबे,धनंजय पोखरकर, आंबेगाव शेतमाल प्रक्रिया संस्थेचे संचालक औदुंबर कोकणे व यात्रा कमिटी व सर्व गावडेवाडी ग्रामस्थ बहुसंख्येने हजर होते.
या बैठकीत ह.भ.प. बाळू बुवा बळवंत गावडे यांनी यात्रेला एक लाख रुपये देणगी देण्याचे जाहीर केले. ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.यात्रा उत्साहात शांततेत पार पाडावी असे अवाहन यात्रा कमिटीच्या वतीने यावेळी करण्यात आले.शेवटी पांडुरंगाच्या आरतीने या बैठकीची सांगता झाली