शिक्षण हे केवळ परीक्षांसाठी नसून ते जीवन घडवण्याचे एक साधन – डॉ.निलिमा ढोबळे

शिक्षण हे केवळ परीक्षांसाठी नसून ते जीवन घडवण्याचे एक साधन – डॉ. निलिमा ढोबळे
मानवाच्या जीवनात शिक्षण हे केवळ परीक्षांसाठी नसून जीवन घडविण्याचे ते एक साधन आहे. आत्मविश्वास,मेहनतीची सवय आणि सोबतीला सातत्य असल्यास मोठ्यातील मोठी स्वप्ने सहज साकारता येतात असे मत शिक्षण तज्ञ डॉक्टर सौ.निलिमा सचिनराव ढोबळे यांनी व्यक्त केले आहे.
गावडेवाडी (ता.आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला या कार्यक्रम प्रसंगी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण तज्ञ डॉक्टर नीलिमा ढोबळे,विशेष अतिथी म्हणून सारिका गायकवाड उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी शाळेसाठी बहुउद्देशीय सूचनाफलक व स्टॅन्ड शाळेला सप्रेम भेट दिला.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष गावडे,उपाध्यक्ष जालिंदर गावडे,भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मच्छिंद्र गावडे,शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष अतुल गावडे,शालेय व्यवस्थापन समिती सदस्य सचिन गावडे,शालेय व्यवस्थापन समितीचे मा.अध्यक्ष विशाल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका शशिकला चिखले, शिक्षिका मंदा लोंढे,कल्पना अभंग, स्मिता चासकर,रूपाली लाळगे, दिलीप भवारी यांनी केले.