वाढदिवस साजरा करताना आरोग्य शिबीरांचे आयोजन करावे – मा. आमदार अतुलशेठ बेनके

वाढदिवस साजरा करताना आरोग्य शिबीरांचे आयोजन करावे – मा. आमदार अतुलशेठ बेनके
आंबेगाव तालुका पंचायत समितीचे मा.सदस्य रविंद्र करंजखेले यांच्या वाढदिवसानिमित्त धामणी ग्रामपंचायत, आम्ही धामणीकर प्रतिष्ठाण, प्राथमिक आरोग्य केंद्र धामणी, मैत्री हेल्थकेअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध आजारांवर उपचार व तपासणी शिबीराचे वार – शनिवार, दि ५/४/२०२५ रोजी आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात कॅन्सर तपासणी, सर्व रोग निदान तपासणी, नेत्र तपासणी, रक्त तपासणी, औषधे व स्त्रीरोग तपासणी हाडांची तपासणी सर्व मोफत करण्यात आली. धामणी आणि परिसरातील गावांतील तब्बल ३४७ रुग्णांची यात तपासणी करण्यात आली. ज्या रुग्णांना पुढील उपचाराची आवश्यकता आहे अशा रुग्णांना पुढील उपचारासाठी योग्य मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य शिबीर घ्यायचा मुख्य उद्देश हा आरोग्याच्या तक्रारींचे निदान करणे आणि उपचार करण्याचे नियोजन करणे होते.
मा.आमदार अतुलशेठ बेनके यांनी उद्घाटनप्रसंगी बोलताना सांगितले की,वाढदिवस किंवा इतर सोहळे साजरे करताना आरोग्य शिबीराचे आयोजन करावे जेणेकरुन ग्रामीण भागातील नागरिकांना या शिबीरांचा नक्कीच फायदा होईल. आजच्या या शिबीरात विशेषतः कॅन्सर ची तपासणी होत आहे हे महत्वाचे आहे.कारण सध्या सगळीकडे कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराचे रुग्ण वाढत चालले आहे. ग्रामीण भागात या आजारावरील तपासणीची सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे.
कार्यक्रम प्रसंगी विवेक वळसे पाटील (उपाध्यक्ष जि.प. पुणे), अरुणभाऊ गिरे (उपाध्यक्ष जि.पुणे), निलेश थोरात (सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती), सुनिल बाणखेले (मा. उपसरपंच मंचर),रेश्माताई बोऱ्हाडे (सरपंच) या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
शिबिरामध्ये वैद्यकीय तपासण्या,आरोग्याचे मार्गदर्शन, रोगनिदान, औषधोपचार, आणि इतर संबंधित सेवा या दर्जेदार देण्यात आल्या त्या बद्दल रूग्णांनी कौतुक केले. शिवाजी राजगुरु (उपाध्यक्ष लहुजी वस्ताद साळवे समिती), विठ्ठलराव जाधव (उपसंपादक सामना), संतोष डोके, विलास पगारिया, शांताराम जाधव, उपसरपंच अक्षयराजे विधाटे, मा. सरपंच अनिल डोके, बाळासाहेब पोखरकर (अध्यक्ष मैत्री हेल्थ फाऊंडेशन), वसंतराव जाधव (सचिव भिमाशंकर शिक्षण संस्था), सुभाष जाधव ( नेते ) नितिन जाधव ( तंटामुक्ती अध्यक्ष )रामदास जाधव (सरचिटणीस), विठ्ठल शेवाळे (ग्रामपंचायत अधिकारी ) सोमवंशी सर (प्राचार्य शिवाजी विद्यालय) अनुराधा कथले (मुख्याध्यापिका), डॉ. भुषण साळी, डॉ जयेश बिरारी (वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र धामणी ) वामनराव जाधव ,महेश कदम (अध्यक्ष शालेय व्यवस्थापान कमेटी), कैलास वाघ (उपसरपंच पहाडदरा) ,मनोज तांबे (मा .सरपंच ) ,मयूर सरडे (मा. उपसरपंच ) कोंडीभाऊ तांबे (मा.चेअरमन),दिपक जाधव (व्हा. चेअरम) , शामराव करंजखेले , संदिप बोऱ्हाडे ,संतोष करंजखेले (मा. उपसरपंच ), निलेश करंजखेले ,शांताराम रोडे , आनंदा जाधव अमोल गाढवे ,श्रीकांत विधाटे , अमोल जाधव सतिश पंचरास , सोमनाथ सोणवने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. सरपंच सागर जाधव यांनी केले, सुत्रसंचालन मा. सरपंच अंकुश भूमकर यांनी केले.