आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीराजकीय

आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव(खडकी) येथे १२.३८ रुपये निधीतून होणाऱ्या पाणी पुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर !!

आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव(खडकी) येथे १२.३८ रुपये निधीतून होणाऱ्या पाणी पुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर !!

शिवसेना उपनेते, मा.खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव(खडकी) गावासाठी महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब, पाणी पुरवठा मंत्री मा.ना.गुलाबरावजी पाटील व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.चंद्रकांत दादा पाटील यांनी १२.३८ कोटी रुपये निधीतून जल जीवन योजनेअंतर्गत अत्याधुनिक पाणीपुरवठा योजना मंजूर केली असून ह्या कामाचा भूमिपूजन समारंभ मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न झाला होता.

आज घोडनदी पात्रात सुरू असलेल्या जॅकवेल कामाचा तसेच वितरण व्यवस्थेसाठी करण्यात येणाऱ्या पाईपलाइन कामाचा युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर यांनी स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थांसमवेत आढावा घेतला व संबंधित यंत्रणेला काही आवश्यक सूचना देखील केल्या. पिंपळगाव(खडकी) येथे होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेतून अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्प, घोडनदीपात्रात स्वतंत्र विहीर, जॅकवेल, पंपहाऊस, ३ ठिकाणी एकूण ५ लक्ष लिटर क्षमतेच्या उंच पाण्याच्या टाक्या, ३२ किलोमिटर परिसरात पाण्याची पाइपलाइन द्वारे ५५ लिटर प्रति मानसी २४ तास शुद्ध पाणी पुरवठा नागरिकांना केला जाणार आहे.

यावेळी शिवसेना शाखाप्रमुख कैलास पोखरकर, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल बांगर, विभागप्रमुख विकास बांगर, युवासेना उपतालुकाप्रमुख राहुल पोखरकर पाटील, जेष्ठ नेते अभिलाष घेवारी, युवानेते योगेश बांगर, युवा उद्योजक राहुल पोखरकर, भाजपचे शाखा अध्यक्ष निखिल पोखरकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.