आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

धामणी (ता.आंबेगाव) येथे सोमवारी संपन्न होणार सोमवतीचा सोहळा!!

धामणी (ता.आंबेगाव) येथे सोमवारी संपन्न होणार सोमवतीचा सोहळा!!

लोणी-धामणी (ता.आंबेगाव) येथील कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थानच्या वतीने सोमवार (दि.17) रोजी सोमवती अमावस्या उत्सव साजरा करण्यात येणार आहे.या निमित्त देवमळ्यातील विहिरीवर लोकवर्गणीतून बांधण्यात आलेल्या सोमवतीच्या ओट्याचे लोकार्पन,देवाच्या मुखवट्याला शाही स्नान,मिरवणूक व महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. याबाबतचा निर्णय ग्रामस्थ,पंचक्रोशीतील भाविक देवाचे मानकरी,सेवेकरी यांच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती देवस्थानच्या वतीने प्रकाश जाधव पाटील यांनी दिली.

सोमवती अमावस्या उगवती असून तिचा पुण्यकाल सूर्योदय ते सूर्यास्त असा आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी लवकर देवाचे पंचधातूचे मुखवटे पालखीतून शाही स्नानासाठी भगतांच्या विहिरीवर आणण्यात येणार असल्याचे वाघे मंडळींनी सांगितले.

सोमवतीच्या ओट्याचा लोकवर्गणीतून जिर्णोद्धार करण्यात आला आहे.सोमवतीला या ओट्यावर नरके मंडळी (तळेगाव ढमढेरे)राजगुरू मंडळी (अवसरी खुर्द) पंचरास मंडळी(कवठे यमाई) वाळुंज मंडळी (वाळुंजनगर लोणी)आगरकर मंडळी (पाबळ) गावडे मंडळी (गावडेवाडी) पडवळ व आवटे मंडळी (महाळुंगे पडवळ) यांच्या हस्ते खंडोबाच्या पंचधातूच्या मुखवट्याला शाही स्नान घालण्यात येणार आहे. तसेच सोमवतीच्या ओट्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर पूजा व महाआरती झाल्यानंतर परगावहून आलेल्या मानकरी मंडळींचा देवस्थानच्या वतीने मानाचा पोशाख देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

देवाच्या मुखवट्याची पालखीतून पारंपारिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात येणार आहे.धामणी लोणी येथील पंचरास मंडळींचे वादनाचे ताफे या मिरवणुकीत सामील होणार आहेत. भाविक व ग्रामस्थांसाठी ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी खंडोबा देवस्थानचे मुख्य पुजारी दादाभाऊ भगत,प्रभाकर भगत, सुभाष तांबे, धोंडीबा भगत, माऊली जाधव वाघे, दिनेश जाधव, सिताराम जाधव वाघे, शांताराम भगत,नामदेव वीर,सरपंच रेश्मा बोराडे, प्रमोद देखणे, माजी सरपंच सागर जाधव, गणेश तांबे यांसह ग्रामस्थ ,सेवेकरी, मानकरी, खांदेकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.