आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

महाराष्ट्र पोलीस मित्र पदाधिकाऱ्यांचा वाढदिवस अध्यात्म व सामाजिक पद्धतीने साजरा!!

महाराष्ट्र पोलीस मित्र पदाधिकाऱ्यांचा वाढदिवस अध्यात्म व सामाजिक पद्धतीने साजरा!!

संभाजी पाटील: कोल्हापूर

सेंट्रल गव्हर्मेंट रजिस्टर डी.एस.राठोड फाउंडेशन व मार्शल योगा अकॅडमी संचलित महाराष्ट्र पोलीस मित्र हे अनेक वर्ष झाले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निस्वार्थ व निशुल्क सामाजिक कार्य करत आहेत. आज महाराष्ट्र पोलीस मित्र चे अधीक्षक डॉ.सुरेश राठोड व उपनिरीक्षक प्रवीण बेडक्याळे यांचा वाढदिवस महाराष्ट्र पोलीस मित्राने आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला.


महाराष्ट्र पोलीस मित्र अधीक्षक डॉ राठोड व उपनिरीक्षक बेडकिळे यांचा वाढदिवस योगायोगाने एकाच दिवशी असल्यामुळे, महाराष्ट्र पोलीस मित्र परिवारातील आनंदाच्या क्षणाला साजरा करण्यासाठी, प्रथम नाशिक, कोल्हापूर(करवीर), हातकणंगले, राधानगरी, गडहिंग्लज, कागल, येथील पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर येथील गजानन महाराज मंदिरामध्ये भाविकांना प्रसाद वाटप करून, आध्यात्मिक रित्या वाढदिवस साजरा केला. तर निरीक्षक संभाजी पाटील व उपनिरीक्षक संजय पाटील यांनी हातकणंगले तालुक्यातील वृद्धाश्रम येथे, सामाजिक बांधिलकी राखत राधानगरी, हातकणंगले, शिरोळ, करवीर तालुक्यातील पोलीस मित्र पदाधिकारी यांना एकत्रित घेऊन वृद्धाश्रमाला आर्थिक व अन्नदान करून वाढदिवस साजरा केला. तर उपनिरीक्षक डॉ.मॅडी तामगावकर यांनी सांस्कृतिक व मनोरंजनात्मक रित्या वाढदिवस साजरा केला.


या आध्यात्मिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन, राज्य राखीव पोलीस दलाचे सहाय्यक कमांडंट सदानंद सदांशिव यांनी पोलीस दलाकडून, मध्यवर्ती कारागृह चे पोलीस उपाधीक्षक साहेबराव आडे व सेवानिवृत्त सुभेदार आर.एस.पाटील आर्मी संजय जांभीरकर यांनी ढोल, ताशा व सनईच्या गजरामध्ये डॉ. सुरेश राठोड यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा केला.
यावेळी, महाराष्ट्र पोलीस मित्र पोलीस महानिरीक्षक डॉ सुशील अग्रवाल, निरीक्षक संभाजी पाटील, डॉ आश्लेषा चव्हाण, उपनिरीक्षक सागर शेळके, ईश्वरा गायकवाड, सहाय्यक उपनिरीक्षक अजिंक्य कावनेकर, बाजीराव पाटील, लता चौगुले, प्रकाश चौगुले, अमर चौगुले, सुजाता भोकरे, मनोज कांबळे सर, अनिकेत पाटील, प्रकाश नाडे, दिलीप जाधव, शकील जमादार, दत्तात्रेय कोणीकेकर, शौकत मानगावे, लोहार सर, अग्नेल चव्हाण व सर्व पोलीस मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.