आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

गणेशोत्सवात झेंडू खातोय भाव!! उत्पादक शेतकरी आनंदात!!

गणेशोत्सवात झेंडू खातोय भाव!! उत्पादक शेतकरी आनंदात!!

सध्या गणेश उत्सव सुरू असून गणेशोत्सवामुळे झेंडू फुलाला चांगला बाजारभाव मिळत आहे. सध्या प्रति किलो 130 ते 140 रुपये बाजारभाव मिळत असल्याने झेंडू उत्पादक शेतकरी समाधानी असून एका कॅरेट ला 1200 ते 1300 रुपये लागून येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होताना दिसत आहे.

सध्या गणेश उत्सव सुरू झाला असून गणपती उत्सवात झेंडूच्या फुलांना विशेष मागणी असते.सध्या झेंडू फुलाला 120 ते 130 रुपये प्रतिक्रिया बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे 10 किलोच्या एका कॅरेट ला 1200 ते 1300 रुपये शेतकऱ्यांना मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होत आहे. गेल्या आठ दिवसापूर्वी मात्र झेंडूचे दर हे कमी होते त्यावेळेस झेंडू परवडत नव्हता.परंतु गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर झेंडूच्या फुलांची मागणी वाढली व त्यामुळे शेतकऱ्यांना झेंडूचा फुलापासून चांगला फायदा होत आहे. काठापूर बुद्रुक येथील शेतकरी यांनी 52 गुंठे शेतात झेंडूचे पीक घेतले आहे. झेंडू लागवड केल्यापासून त्यांना अजून पर्यंत 80 हजार रुपये भांडवली खर्च आला आहे.सहा ते सात तोडे अजून पर्यंत झेंडूचे झाले असून. अजूनही आठ ते नऊ तोडे होण्याची आशा आहे.

झेंडू लागवडी नंतर मोठ्या प्रमाणावर झालेला पाऊस वातावरणातील बदल यामुळे मोठ्या प्रमाणात चेंडूवर रोगराई आली.फुलांवर याचा परिणाम झाला. बाजारभाव कमी असल्याने सुरुवातीला झेंडू परवडत नव्हता. तरीही त्यांनी झेंडूचे चांगल्या प्रकारे जोपासना केली.सध्या झेंडूला चांगला बाजारभाव मिळत आहे.आता एका तोड्याला 70 ते 80 कॅरेट झेंडू फुल निघत आहे.एका तोड्याचे 80 ते 90 हजार रुपये या शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे झेंडुपासून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे.

12 13 दिवसांपूर्वी 25 ते 30 रुपये प्रति किलो असा झेंडूला बाजारभाव होता. गणेश उत्सव सुरू झाल्यानंतर हा बाजार भाव 80 ते 90 रुपये किलो झाला कालपासून हा बाजार भाव 120 ते 130 रुपये किलो झाला आहे. त्यामुळे सध्या झेंडू पासून चांगला आर्थिक फायदा होत आहे. असे काठापूर बुद्रुक येथील शेतकरी योगेश खंडु करंडे यांनी सांगितले

24 जून रोजी सुपरस्टार वाणाची लागवड शेतकरी योगेश करंडे यांनी केली होती. 16 ऑगस्टला पासुन या झेंडूची तोडणी सुरू झाली होती. तेव्हापासून झेंडूचे बाजार भाव हे कमी होते. त्याचप्रमाणे या काळामध्ये मोठ्या प्रमाणा पाऊस व वातावरणामुळे झेंडूचे नुकसान झाले. परंतु शेतकऱ्यांनी गणेशोत्सवात चांगला बाजार भाव मिळेल या भावनेने जोपासना केली. आणि आता या झेंडू पासून चांगले उत्पादन मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत.शेतकरी योगेश करंडे यांना ज्ञानेश्वर नरवडे यांनी मार्गदर्शन केले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.