आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

भारताचा ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निम्मित्ताने ओम त्रिदेव मठ येथे विविध उपक्रम!!

भारताचा ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निम्मित्ताने ओम त्रिदेव मठ येथे विविध उपक्रम!!

कोल्हापूर प्रतिनिधी- भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निम्मित्ताने जागोजागी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पन्हाळा तालुक्यातील करंजफेण व नणंद्रे येथे योद्धा अकॅडमी आणि महाराष्र्ट पोलीस मित्र संघटनेच्यावतीने ओम त्रिदेव योग आध्यात्मिक मठाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपन करून समाजभान जपलयं. याचबरोबर ओम त्रिदेव मठाच्या मठाधिपती यांची स्थापना करण्यात आली.

भारताचा ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निम्मित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. विविध शाळांच्या वतीने प्रभात फेरी काढून हुत्म्यांचा नामघोष करण्यात आला. तर गावोगावी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं.

केर्ली इथल्या योद्धा अकँडमीचे ध्वजारोहन पोलीस उपअधिक्षक सदानंद सद्दांशिव यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान विद्यार्थ्थांनी संचलन करून मानवंदना दिली. योद्धा अकँडमी आणि महाराष्र्ट पोलीस मित्र संघटनेच्यावतीनं पन्हाळा तालुक्यातील करंजफेण व नांनुद्रे इथल्या ओम त्रिदेव योग आध्यात्मिक मठाच्या परिसरात वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्य दिनाच्या निम्मित्ताने ओम त्रिदेव योग आध्यात्मिक मठाची स्थापनावेळी ट्रस्टी डॉ. सुशील अग्रवाल, डॉ सुरेश राठोड, डॉ कृष्णदेव गिरी यांच्या संमतीने मठाधिपती म्हणून आंतरराष्ट्रीय योग सद्गुरु डॉ. कृष्णदेव गिरी यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान मठाधिपती यांचे भक्तांनी दर्शन घेतले. पर्यावरणाचा समतोल रहावा या हेतूने मठाच्या परिसरात भारतीय जातीची विविध प्रकारची शेकडो झाडे लावण्यात आली. याचबरोबर कोल्हापुरातील जैन समाजाकडून ही मोठ्या प्रमाणावरती वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी योद्धा अकँडमीचे संस्थापक आर.एस.पाटील, संजय जांभिलकर, सरदार पाटील, विश्वास पाटील, संजय पाटील, किशोर पाटील, डाॅ.वैद्य गुंडोपंत सुतार, गौतम माळी, पद्मा कांबळे, वैशाली झांजगे, नितीन गिरी, पत्रकार राजाराम चौगुले, संभाजी पाटील, युवराज मिरजकर, रमेश पाटील, नणुंद्रेचे माजी सरपंच विजय बाऊचकर, पत्रकार विक्रम पाटील, प्रकाश उर्फ चंद्रकांत पाटील, गोरख बाऊचकर, सागर वरपे, जे.एन.पाटील, संभाजी सुतार, योद्धा कमांडो अकॅडमी चे सर्व विद्यार्थी व महाराष्ट्र पोलीस मित्राचे सर्व पदाधिकारी मोठ्या प्रमाणावरती उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.