आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

एस आर पी एफ ग्रुप 16 कोल्हापूर येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त वृक्षारोपण!!

एस आर पी एफ ग्रुप 16 कोल्हापूर येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त वृक्षारोपण!!

कोल्हापूर प्रतिनिधी: डॉ सुरेश राठोड
पोलीस अधीक्षक तथा समादेशक नम्रता पाटील यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम ‘वृक्षारोपण ही आजच्या काळाची गरज’ या दूरदृष्टी विचारातून राज्य राखीव पोलीस गट क्रमांक 16 कोल्हापूर कॅम्प नंदवाळ ( ता. करवीर) येथे वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. विविध प्रकारच्या 300 वृक्षांचे वृक्षारोपण पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मार्फत होत आहे.


आज पर्यावरणाचा प्रश्न सर्व जगाला भेडसावत असून, समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन ही भविष्य काळाची गरज आहे. वृक्षारोपण कार्यक्रमाकरिता सहा. समादेशक सदानंद सदांशिव, सहा. समादेशक हिंगरूपे, पोलीस निरीक्षक लिपारे, तांदळे, पोलीस उपनिरीक्षक गेंगजे, उदय साळुंखे, वारंग व पोलीस अंमलदार आधी पदाधिकारी उपस्थित होते. पूर्ण कार्यक्रमाचे नियोजन पोलीस उपनिरीक्षक अशोक गुजर यांनी केले व सर्वांचे आभार व्यक्त केले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.