“नातेकलेचे त्या रक्ताशी” या लेखमालेचे आजचे आकर्षण सौ.रूपाली विशाल इनामदार

बहुगुणी, बहुज्ञानी, रत्नपारखी रसिक राज…“नातेकलेचे त्या रक्ताशी” या लेखमालेचे आजचे आकर्षण….
रूपाली विशाल इनामदार तमाशा पंढरी नारायणगावकर तालुका जुन्नर ,जिल्हा पुणे होय रूपालीताई च्या आईचे नाव शालन बाई असे असून, तिला दोन मुले आहेत. रूपाली ताई दहा वर्षांच्या असतानाच त्यांना कलेचा छंद लागला. आपणही आपल्या आईसारखे कलावंत होऊ आणि चांगल्या प्रकारे नाचकाम शिकू अशी जिद्द मनात धरून, आई सोबतच डान्स काम करू लागली. रूपाली ताई चे वडील पेटी मास्तर असल्यामुळे ताल,स्वर,लय या त्रिवेणी संगमाने रूपालीताई चांगलीच तयार झाली. ती जशी जशी मोठी झाली तशी सर्व कला तिच्या अंगात अवगत झाली . स्वतःची आई गुरु असल्यामुळे आता रूपाली ताई बोलपट करण्यात चांगलीच हुशार झाली. आता ती फारशातही काम करू लागली.रूपाताई चे आई वडील कलावंत असल्यामुळे रूपाही लवकरच कलाबद्ध झाली. आता रूपा ताईला परमेश्वराने आवाजाची एक देणगी बहाल केली. सुमधुर कोकिळेसारखा कंठ रूपा ताईला प्रकट झाला होता. रूपाताई गायनही करू लागली. आपल्या आवाजाच्या जादूने रसिकांची मनी जिंकू लागली. रूपाताईच्या चेहऱ्यावर इतके चंद्रबळ आहे की, रसिक तिची अदाकारी पाहून त्यांच्या डोळ्याचे पारणे फिटतात असे वाटते. रूपाताई नऊवारी साडी, अंग भरून चोळी, केसाचा अंबाडा, नाकात नथ, कंपाळी कुंकू, हातभर बांगड्या, हा लावणीचा बाज घातल्यावर रसिक टाळ्या व शिट्ट्यांच्या, गजरात त्यांचे स्वागत करतात. स्वतः लावणी गाऊन नृत्य करून आपल्या हवा भावाने रसिकांना मान डोलायला लावतात हे नक्की. आपल्या आईबरोबर रूपाने शिवराम बापू बोरगावकर या तमाशातही काम केले. नंतर ऑर्केस्ट्रा, लावणी शो यामध्येही काम केले. अंतर *स्वर्ण पदक विजेत्या विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर* यांची (रत्नकन्या) सौ मालती ताई इनामदार या तमाशामध्ये प्रवेश केला. त्या तमाशात स्वतः गायन, हिंदी मराठी गाण्यावर डान्स, लावणी, वगनाट्य यामध्ये काम करून एक नंबर ने महाराष्ट्रामध्ये नाव गाजविले. त्याच तमाशात विशाल भाऊ इनामदार हे पॅड, ढोलकी,गायक असून ते सौ.मालती ताई यांचे चिरंजीव आहेत. आता रूपाताई व विशाल चे प्रेम संबंधात रूपांतर झाले.( रत्नकन्या) सौ. मालती ताई इनामदार या तमाशाला रूपाचे अतिशय मोठे योगदान आहे. रूपाने, कुठे गेली आईची माया, आई तुझं लेकरू, मुंबईची केळेवाली, सौभाग्य मिळालं येडीला, जन्माला आला अतिरेकी. इत्यादी वगनाट्यात काम करून आपल्या भूमिका एक नंबर ने पार पाडल्या. आज रूपाचे वय 37 वर्षाचे असून गेली 27 वर्षे रसिकांची सेवा करीत आहे. रूपाताई म्हणतात की, खऱ्या कलेला किंमत राहिली नाही, रसिक फक्त गाणी मागतात,तमाशाचा जुना बाज नाहीसा झाल्यामुळे, मनाला खूप खंत वाटते. रसिकांनी कलावंतांची कदर राखली तरच कला टिकेल, आणि कलेला नवी संजीवनी प्राप्त होईल. खऱ्या अर्थाने सर्व तमाशा फड मालकांनी,एकाजुटीने जुना तमाशा चा बाज दाखविला तर, रसिक कलेकडे पाठ फिरवणार नाहीत. आणि जुना बाज तमाशाला प्राप्त होईल. हे अगदी नक्की….. या तमाशा मंडळाचे संचालक मॅनेजर मुसाभाई इनामदार हे असून,ते खूप हुशार,ज्ञानी आहेत. या तमाशाची धुरा खांद्यावर घेऊन संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, समाज प्रबोधन करतात. त्यांचे नाव महाराष्ट्रात झळकत राहो,रूपाताईंच्या हातून रसिकांची,रंगदेवतेची सेवा घडो,त्यांना उदंड आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
😊
लेखक✍🏻
शाहीर खंदारे
ता. नेवासा
मो.8605558432