आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

अलिबाग येथे आपत्ती व्यवस्थापन जनजागृतीसाठी महामॅरेथॉन संपन्न!!

राज्यात उद्भवणाऱ्या विविध आपत्ती संदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशाने महा मॅरेथॉनचे आयोजन - जिल्हाधिकारी किसन जावळे

अलिबाग येथे आपत्ती व्यवस्थापन जनजागृतीसाठी महामॅरेथॉन संपन्न!!

राज्यात उद्भवणाऱ्या विविध आपत्ती संदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशाने महा मॅरेथॉनचे आयोजन – जिल्हाधिकारी किसन जावळे

अलिबाग प्रतिनिधी-राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय तसेच विविध सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने राज्यात उद्भवणाऱ्या विविध आपत्ती संदर्भात जनजागृती करण्यासाठी जिल्हास्तरावर अलिबाग येथे रॅली /महा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या शुभहस्ते ‘ महा मॅरेथॉन-एक धाव सुरक्षेची ‘ या आशयाचा झेंडा दाखवून सदरील मॅरेथॉनची सुरुवात करण्यात आली. ही मॅरेथॉन कन्या शाळा, राम मंदिर, महावीर चौक, बालाजी मंदिर, हनुमान मंदिर ते पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय येथे येवून समाप्त करण्यात आली.

या उपक्रमात माणुसकी प्रतिष्ठान जितनगर वायशेत, तेजस्विनी फाऊंडेशन अलिबाग रायगड, लायन्स क्लब ऑफ डायमंड अलिबाग, स्पर्धा विश्व अकॅडमी अलिबाग, लायन्स क्लब ऑफ श्रीबाग, होमगार्ड्स, आपदा मित्र, जे एस एम विद्यालयाचे एन सी सी, एन एस एस विद्यार्थी व विविध संस्थाचा सहभाग होता.


यावेळी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जिल्हाधिकारी सागर पाठक, अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील, डॉ. राजाराम हुलवान, स्पर्धा विश्व अकॅडमी अध्यक्षा तपस्वी गोंधळी, तेजस्विनी फाऊंडेशन अध्यक्षा ॲड. जिवीता पाटील, लायन्स क्लब ऑफ डायमंड अध्यक्षा लायन डॉ.रेखा म्हात्रे, जनशिक्षण संस्थान रायगड अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, लायन डॉ.ॲड.निहा राऊत, ॲड.भूपेंद्र पाटील, रोटरी अलिबाग तन्वी शेट्ये इ. तहसील कार्यालय अधिकारी/कर्मचारी वर्ग , नागरिक, विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते.

सदरील स्पर्धेत प्रथम क्रमांक यश म्हात्रे, द्वितीय क्रमांक अजय नाईक आणि तृतीय क्रमांक शिव निर्मल याने पटकावला तर मुलींमध्ये प्रथम क्रमांक दिव्या मोकल, द्वितीय क्रमांक सृष्टी शिंदे आणि तृतीय क्रमांक समिना पटेल यांनी पटकावला. या सर्व विजेत्यांना जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्रक व मेडल देण्यात आले. सहभागी स्वयंसेवकांना आयोजक संस्था चौरंग मुंबई यांनी टीशर्ट, अल्पोपहार, प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी यांनी अलिबाग मध्ये कोणताही शासकीय उपक्रम आयोजित केला असता अनेक संस्था व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात त्याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांचे विशेष कौतुक केले. तसेच निरोगी जीवन जगण्यासाठी व्यायामाला महत्त्व द्या असाही सल्ला यावेळी त्यांनी उपस्थितांना दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान यांनी केले तर आभार प्रदर्शन तहसीलदार विक्रम पाटील यांनी केले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.