महाराष्ट्र पोलीस मित्रच्या वतीने महावृक्षारोपण होणार संपन्न!!
महाराष्ट्र पोलीस मित्र च्या वतीने महावृक्षारोपण होणार संपन्न!!
कोल्हापूर डॉ. सुरेश राठोड
नणूद्रे-करंजफेन (ता. पन्हाळा) कोल्हापूर येथे गुरुवार दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी मार्शल योगा अकॅडमी संचलित महाराष्ट्र पोलीस मित्र, डी एस राठोड फाउंडेशन, हिंदू धर्मगुरू दशनाम गोस्वामी आखाडा व ट्रस्टी डॉ सुशील अग्रवाल, डॉ कृष्णदेव गिरी यांच्या मान्यतेने ॐ त्रिदेव योग आध्यात्मिक मठाची स्थापना करून त्या मठाच्या मठाधिपती जागतिक नामांक असणारी योगसद्गुरु डॉ. कृष्णदेव गिरी महाराज यांची निवड करण्यात आली आहे. यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्ग देवतेची वृक्ष लागवड योग भक्ती करून या भक्तीच्या शक्तीतुन पुण्य कमवून आनंदी आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी वृक्ष लागवड करण्यासाठी १५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० वा. सर्व निसर्गप्रेमींना व साधकांना आवाहन करण्यात येत आहे. आपल्या कुटुंबाचा एक वृक्ष लागवड करण्यासाठी ॐ त्रिदेव योग आध्यात्मिक मठ, नणुंद्रे-करंजफेन, ता. पन्हाळा,
कोल्हापूर या ठिकाणी उपस्थित राहून निसर्ग देवतेची आरोग्यदायी आनंदी जीवनाची पुण्यशक्ती प्राप्त करूया आणि महाप्रसादाचा आस्वाद घेऊया. असे आव्हान डॉ. सुशिल अग्रवाल, चंद्र पाटील, नितीन गिरी, राजाराम चौगुले, संभाजी पाटील, सागर शेळके, युवराज मिरजकर, वैशाली झांजगे, प्रकाश खतकर, योद्धा अकॅडमी केरले, बर्थडे ग्रुप, ग्रामपंचायत नणूद्रे, करंजफेन व सर्व महाराष्ट्र पोलीस मित्र यांनी केले.