इंटरनॅशनल तमिळ युनिव्हर्सिटी युनाइटेड स्टेट ऑफ अमेरिका वतीने मानद डॉक्टरेटने संकेत अंकुश रोडे चा सन्मान!!
इंटरनॅशनल तमिळ युनिव्हर्सिटी युनाइटेड स्टेट ऑफ अमेरिका वतीने मानद डॉक्टरेटने संकेत अंकुश रोडे चा सन्मान!!
पुणे – आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे पुणे येथील युवा डॉ.संकेत अंकुश रोडे यांना मदुराई येथे पार पडलेल्या पदवी प्रदान कार्यक्रमात मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.
मूळचे पुण्याचे असलेल्या संकेत रोडे यांनी २०१४ मध्ये आरोग्य क्षेत्रात सेवा देण्याची सुरवात केली.२०१९ साली आपणासी ‘’जे जे ठावे ते ते दुसऱ्यासी सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जन…यां उक्ती प्रमाणे शिक्षण क्षेत्रात ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थी साठी प्रथमच पॅरामेडिकल क्षेत्रातील संधी उपलब्ध करून त्यांना रोजगार दिला. वेस्टर्न विन फाऊंडेशनची स्थापना करून समाजातल्या वंचित, उपेक्षित, कष्टकरी लोकांसाठी आरोग्य आणि शिक्षण सेवा सुरू केली.
वैद्यकीय आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या या कामगिरीची दखल घेवून इंटरनॅशनल तमिळ युनिव्हर्सिटी युनाइटेड स्टेट ऑफ अमेरिका यांनी
हा बहुमान डॉ.संकेत रोडे यांना डॉ. जे. विजयदुराई (मदुराई कामराज युनिव्हर्सिटी हेड ) याच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
दरम्यान सामाजिक बांधिलकी जोपासून काम करीत असताना अशी दखल घेतली जाते, तेव्हा काम केल्याचे समाधान वाटते. आई-वडील आणि गुरु याच्या संस्कारामुळे सामाजिक दृष्टी व्यापक झाली. त्यामुळे वैद्यकीय आणि शिक्षण क्षेत्रात काम करण्याचे धाडस केले. या प्रवासात आई-वडील , भाऊ-बहिणीसह पत्नी सौ. रेखा हिने मोलाची साथ दिली आहे. त्यामुळे हे शक्य होत आहे, असे डॉ.संकेत रोडे यांनी सांगितले.