आत्मा मालिक शैक्षिणक व क्रीडा संकुल शहापूर येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात संपन्न!!
संकुलातील दोन्ही स्कूल मध्ये जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन साजरा करण्यात आला.
आत्मा मालिक शैक्षिणक व क्रीडा संकुल शहापूर येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात संपन्न!!
संकुलातील दोन्ही स्कूल मध्ये जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन साजरा करण्यात आला.
शहापूर येथे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट (कोकामठाण) संचालित,आत्मा मालिक शैक्षिणक व क्रीडा संकुल मोहिली – अघई ता. शहापूर येथे परमपूज्य सद्गुरु आत्मा मालिक माऊलीच्या कृपा आशीर्वादाने,समस्त संत परिवाराच्या प्रेरणेतून संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी साहेब, विश्वस्त मंडळ व संकुलाचे कार्याध्यक्ष तथा विश्वस्त उमेश जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाने संकुलात आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम स्कूल व आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल मध्ये जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन साजरा करण्यात आला.
यावेळी आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य अनिल पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख दिपाली खांडगे,तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजश्री अबनावे यांनी केले.
आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये प्राचार्य कैलास थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मोहन साबळे,सविता जोशी तर आभाप्रदर्शन सावळीराम शिंदे, रुपेश कोरे यांनी केले. कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.
यावेळी आत्मा प्रतिमा व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.विविध सांस्कृतिक कार्यक्रमात तरापा नृत्य,आदिवासी लोक नृत्य- कला विद्यार्थांनी सादर केली.स्वरांजली ग्रुपने संगीत सेवा सादर केली.यावेळी संकुलाचे कार्याध्यक्ष उमेश जाधव साहेब, स्थानिक सदस्य अनंत गायकवाड प्रवीण मोरे शैक्षणिक संचालक तथा प्राचार्य डॉ डी डी शिंदे,जनरल व्यवस्थापक गुलाब हिरे यांच्या संकुलाचे पदाधिकारी यांनी आदिवासी दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.