आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

शिरदाळे गावचा तलाव पाहण्याची इच्छा पूर्ण – सौ.किरणताई वळसे पाटील

शिरदाळे गावचा तलाव पाहण्याची इच्छा पूर्ण – सौ.किरणताई वळसे पाटील

आंबेगाव तालुक्यातील शिरदाळे गाव हे मिनी माथेरान असल्याची भावना अनुसया महिला उन्नती केंद्राच्या संस्थापिका अध्यक्षा सौ.किरणताई दिलीपराव वळसे पाटील यांनी व्यक्त केली. तसेच खूप दिवसांनी शिरदाळे गावचे प्रसिद्ध असणारे तळे पाहण्याची इच्छा पूर्ण झाली असे देखील ताईंनी आवर्जून सांगितले.

काल शिरदाळे येथील महिलांशी हितगुज,गप्पागोष्टी तसेच लाडकी बहीण योजना इतर शासकीय योजना यांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी किरणताई शिरदाळे तेथे आल्या होत्या. शिरदाळे गावावर साहेबांचे विशेष प्रेम असून निधीच्या बाबतीत कायम साहेब या गावाला झुकते माप देत असतात तर मला देखील शिरदाळे येथील तळे पाहण्याची खूप दिवसांनी इच्छा होती ती आज पूर्ण झाली असून याआधी बऱ्याचदा येण्याचा योग आला पण रात्रीच्या वेळी दौरे असल्याने तळे पाहायला मिळत नव्हते. आज मात्र संपूर्ण तळे आणि परिसर पाहून समाधान वाटले. तसेच येथील थंड हवामान, तरुणांच्या सहभागामुळे गावचा झालेला विकास या गोष्टी अधिक ठळकपणे जाणवतात असे देखील ताईंनी सांगितले.


यावेळी त्यांच्या सोबत आंबेगाव तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सौ.सुषमाताई शिंदे,मा.जिल्हा परिषद सदस्य सौ.रेवतीताई वाडेकर,राष्ट्रवादी महिला कार्याध्यक्षा सौ.माणिकताई गावडे,युवती अध्यक्षा कु.अक्षदा शिंदे,संचालिका सौ.पुष्पलताताई जाधव,उद्योजिका सौ.शकुंतला काचोळे,शालनताई यादव या महिला भगिनी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष मा.निलेश (स्वामी थोरात),पंचायत समिती सदस्य मा.रवींद्र करंजखेले,शरद बँकेचे संचालक मा.अशोक आदक पाटील,खरेदी विक्री संघाचे मा.अध्यक्ष मा.भगवानराव वाघ,राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस मा.रामदास जाधव,राष्ट्रवादी गण अध्यक्ष मा.बाळशीराम वाळुंज,उद्योजक मा.लक्ष्मणराव कचोळे,राष्ट्रवादी युवक गट अध्यक्ष मा.सुमित वाळुंज,धामणी गावचे मा.सरपंच सागर जाधव,पहाडदरा ग्रामपंचायत सदस्य मा.संकेत वायकर,धामणी सोसायटी व्हा.चेअरमन दीपक जाधव,धामणी गावचे मा.ग्रामपंचायत सदस्य आनंदा जाधव हे मान्यवर तसेच गावातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेस आंबेगाव तालुका उपाध्यक्ष मा.मयुर सरडे,मा.सरपंच मा.मनोज तांबे,मा.सरपंच मा.गणेश तांबे,युवती अध्यक्षा जयश्री तांबे,राष्ट्रवादी कार्याध्यक्ष मा.बाळासाहेब रणपिसे,युवक अध्यक्ष मा.निवृत्ती तांबे,युवक उपाध्यक्ष कु.भुपेंद्र तांबे,विद्यार्थी अध्यक्ष कु.अनिकेत चौधरी,विद्यार्थी उपाध्यक्ष कु.सिद्धार्थ तांबे,ओम चौधरी,विक्रम तांबे यांनी केले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.