आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

धामणी (ता.आंबेगाव) येथील आरोग्य शिबिरात २३० रुग्णांची तपासणी!!

धामणी (ता.आंबेगाव) येथील आरोग्य शिबिरात २३० रुग्णांची तपासणी!!
—————————————-
लोणी धामणी, प्रतिनीधी, दि .२८ धामणी (ता.आंबेगाव ) येथील संत सावतामाळी विकास मंडळ व ज्ञानज्योती शिक्षण व आरोग्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात २३०रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली आहे


संत शिरोमणी सावता महाराज व संत शिरोमणी नामदेव महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असुन गेली अनेक वर्षे मंडळाच्या वतीने धार्मिक कार्यक्रमाबरोबर आरोग्य शिबीर घेण्यात येतात. ह्या वर्षी हृदयरोग, अस्थिरोग, स्त्रीरोग, नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले

सदर कार्यक्रमाचे उद्घाटन भोसरी रोटरी क्लब चे माजी अध्यक्ष तथा सावतामाळी विकास मंडळ अध्यक्ष ज्ञानेश्वर विधाटे, ज्ञानज्योती शिक्षण व आरोग्य संस्थेचे उपाध्यक्ष प्रदिप भूमकर, संदीप भूमकर,सरपंच रेश्मा बोऱ्हाडे,भीमाशंकर शिक्षण संस्थेचे सचिव वसंत जाधव, आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष भगवान वाघ,रामदास जाधव ,पहाडदरा सरपंच मच्छिंद्र वाघ, पांडुरंग वाळुंज, केशव काळदाते, दत्ता कोल्हे, प्रा. सचिन पवार , पोपट विधाटे, रुपेश विधाटे, रोहीत भूमकर, योगेश विधाटे, बबन भूमकर व ग्रामस्थ उपस्थित होते.


डॉ.विट्ठल विधाटे,रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी चे डॉ. संतोष मोरे, डॉ. योगेश गाडेकर, डॉ.शशांक उगिले , डॉ. विद्या फल्ले यांनी रुग्णांची तपासणी केली.
शिबिरा दरम्यान केंद्रीय अर्थ मंत्रालयचे सल्लागार समितीचे सदस्य डॉ. प्रा. अशोक कुमार पगारिया, विलास पगारिया, शांताराम जाधव, यांनी भेट दिली
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच अक्षय विधाटे तर आभार गणपत विधाटे यांनी मानले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.