आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

बँक,तलाठी कार्यालय, सेतू सुविधा केंद्रात ‘लाडकी बहीण’च्या कागदपत्रांसाठी गर्दीच गर्दी!!

बँक,तलाठी कार्यालय, सेतू सुविधा केंद्रात ‘लाडकी बहीण’च्या कागदपत्रांसाठी गर्दीच गर्दी!!

प्रतिनिधी-समीर गोरडे

राज्य शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे काढण्याकरिता नागरिकांनी तलाठी कार्यालय, सेतू सुविधा केंद्र, तहसील कार्यालयात गर्दीच गर्दी केली होती. त्यामुळे या केंद्रांना यात्रेचे स्वरुप आल्याचे पहावयास मिळाले.

महिलांचे आरोग्य, पोषण व आर्थिक स्वावलंबनासाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर मासिक दीड हजार रुपये जमा हाेणार आहेत. लाभासाठी आधारकार्ड, रहिवासी प्रमाणपत्र अथवा जन्म दाखला, वार्षिक अडीच लाखापर्यंतचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, बँक खात्याच्या पासबुकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, पासपोर्ट फोटो, रेशन कार्ड ही कागदपत्रे बंधनकारक आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी नागरिकांची धावपळ झाली.


लाभासाठी उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी,रेशनकार्डवर नाव वाढ करणे तसेच आधार दुरुस्ती,बँक खाते काढण्यासाठी नागरिकांनी तहसिल कार्यालय,बँक, महा- ई- सेवा केंद्र,आपले सरकार केंद्रावर गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.