आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

वडदरा (खडकवाडी) येथील क्षतिग्रस्त पडवळ कुटूंबियांना मदतीचा हात!!

क्षतिग्रस्त पडवळ कुटूंबियांना मदतीचा हात!!
—————————–
खडकवाडी (ता.आंबेगाव ) येथील वडदरा या ठिकाणी चार दिवसापूर्वी संतोष पडवळ व बबूशा पडवळ यांच्या झोपड्या दिवसा ढवळ्या अज्ञान व्यक्तिने पेटवून दिल्या होत्या.या घटनेत दोघाही पडवळ कुटूंबाचा सर्व संसार जळून खाक झाला.फक्त अंगावरचे कपडे शिल्लक राहिले होते.या घटनेचे वृत कळताच अनेकांनी पडवळ कुटूंबाला मदतीचा हात पुढे केला.

घोडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते उयसिंह चौधरी व सरोजा चौधरी तसेच उद्योजिका ज्योती गोरडे,ॲड.अकबर मूजावर,ॲड.सिध्देश पंडीत यांनी आवशक असणारी भांडी, कपडे व धान्य देऊन पडवळ कुटूंबाला मोठा आधार दिला.

तसेच त्यांना किरकोळ खर्च करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त उदयसिंह चौधरी,उद्योजिका ज्योती गोरडे, कोळवाडी-कोटमदर्यांचे पोलीस पाटील सुनिल डामसे,गोरक्ष डामसे यांनी आर्थिक मदत करून संकटकाळी पडवळ कुटूंबाला आधार देण्याचे काम केले.

खडकवाडी (ता.आंबेगाव ) वडदरा येथे पडवळ कुटूंबाना मदत करताना 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.