ठाणे जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत आत्मा मालिक शैक्षणिक व क्रिडा संकुलतील योगपटूची बाजी!!
ठाणे जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत आत्मा मालिक शैक्षणिक व क्रिडा संकुलतील योगपटूची बाजी!!
ठाणे – जिल्हास्तरीय योगासन स्पोर्ट्स असोएशन ठाणे द्वारा आयोजित ठाणे जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा ह्या सब ज्युनिअर, जूनियर व सीनियर मुली व मुले जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा दि.२७ व २८ जुलै २०२४ रोजी श्री योगी अरविंद गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल बदलापूर येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल मोहिली-अघई ता. शहापूर शाखेच्या आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल मधील ११ व आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूल मधील १० एकूण-२१ विद्यार्थ्यी सहभागी झाले होते.
या स्पर्धा पारंपारिक योगासन, आर्टिस्टिक योगासन, रिदमिक योगासन या प्रकारातून ह्या स्पर्धा झालेल्या होत्या. सब ज्युनिअर पारंपारिक योगासन स्पर्धेमध्ये सी.बी.एस.ई स्कूल चा विद्यार्थी संत सुनील मांजे याने सुवर्णपदक सलोनी गणेश म्हसे हिने रौप्य मेडल स्टेट बोर्ड विद्यार्थी सुरज कृष्णा भोये याने कास्यपदक पटकावून या तिने विद्यार्थ्यांची दि.१६ ते १८ ऑगस्ट रोजी ध्रुव ग्लोबल स्कूल संगमनेर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेकरिता निवड करण्यात आली. तसेच जूनियर मुले या गटातून रिदमिक पेयर मध्ये तेजस जय मेटल व भूपेंद्र विलास भोये व आर्टिस्टिक योगासन पेयर मध्ये तेजस जय मेठल व चेतन प्रकाश कोरडे या विद्यार्थ्यांनी कास्यपदक सब ज्युनिअर मुले आर्टिस्टिक पेअर मध्ये संत सुनील मांजे व तेजस रवींद्र पठारा या विद्यार्थ्यांनी कांस्यपदक सी.बी.एस.ई विद्यार्थी हर्षित उमेश धांगडा चौथा आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूल चे विद्यार्थी चेतन प्रकाश कोरडे पारंपरिक योगासन प्रकारात ज्युनिअर गटातून पाचवा सब ज्युनियर मुली या गटात संजना देवराम दळवी व तनुजा मार्कूस वेडगा या विद्यार्थिनींनी पाचवा क्रमांक पटकाविला. यामधून एकूण सी.बी.एस.ई विद्यार्थ्यांना एक रौप्य व चार कास्यपदक प्राप्त झाली. स्टेट बोर्ड विद्यार्थ्यांना तीन कास्यपदक प्राप्त झाले.
ठाणे योगासन स्पोर्ट असोसिएशन द्वारा या सर्व योगपटूंचे अभिनंदन करून पुढील होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या
या स्पर्धेला ठाणे जिल्ह्यातून अनेक शाळांच्या एकूण ३६० योगपटूंनी सहभाग घेतलेला होता.
हे वृत्त समजताच,विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट ( कोकमठाण) संचलित, संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी साहेब, स्थानिक व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्ष तथा विश्वस्त उमेश जाधव साहेब यांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील योगासन स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच स्थानिक सदस्य अनंत गायकवाड, प्रवीण मोरे,शैक्षणिक संचालक डॉ. डी.डी. शिंदे , जनरल व्यवस्थापक गुलाब हिरे , आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य कैलास थोरात, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य पंकज बडगुजर ,आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य अनिल पाटील, क्रीडा विभाग प्रमुख संदेश चव्हाण सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व क्रीडा विभाग यांनी योगपटूचे कौतुक केले..या सर्व विद्यार्थ्यांसाठी योगशिक्षक पुरुषोत्तम पानबुडे यांनी अथक परिश्रम घेतले.