आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

धामणी(ता.आंबेगाव) येथील श्री विठ्ठल,सावता माळी मंदिराला सतरंजीची देणगी !!!

धामणी(ता.आंबेगाव) येथील श्री विठ्ठल,सावता माळी मंदिराला सतरंजीची देणगी !!!

धामणी (ता.आंबेगाव) येथील श्री.विठ्ठल,सावता माळी मंदिरास यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे निवृत्त उपकुलसचिव श्री.उत्तमराव सावळेराम जाधव यांनी सोलापूर येथून आणण्यात आलेली २०x२५ ची मोठी सतरंजीची भेट दिली.

श्री.संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त येथील श्री.विठ्ठल,सावता माळी मंदिरात रविवारी अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली या दिवशी श्री जाधव यांनी मंदिरातील किर्तन,भजन,हरिपाठ जागरसाठी येणार्‍या भाविकांना बसण्यासाठी सतरंजी मंदिराला देणगी दिली असल्याचे धामणीचे उपसरपंच अक्षयराव विधाटे यांनी सांगितले.

यावेळी सावता माळी मंडळाच्या वतीने देणगीदार श्री.उत्तम जाधव यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान जिर्णोध्दार समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटील जाधव,उपसरपंच अक्षय विधाटे,सावता माळी विकास मंडळाचे उपअध्यक्ष संदीप भुमकर,खजिनदार पोपट सिताराम विधाटे,सचिव अंकुश भुमकर,दिलीप आळेकर,बाळासाहेब बेरी,राजेश भगत,गणपत हरी विधाटे (वधुवर सूचक) गणेश भुमकर,बाळासाहेब विधाटे (सरपंच), गणपत नानाभाऊ विधाटे उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.