आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

अरेच्चा!! पहाडदरा (ता.आंबेगाव) येथील जलवाहिनीचे पाईप झाले लंपास!!

अरेच्चा!! पहाडदरा (ता.आंबेगाव) येथील जलवाहिनीचे पाईप झाले लंपास!!

आंबेगाव तालुक्यातील पहाडदरा येथील पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीचे पाईप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत.त्यामुळे गेली तीन-चार दिवस गावातील पाणीपुरवठा पूर्णतः विस्कळीत झाला आहे.

सरपंच मच्छिंद्र शिवराम वाघ यांनी सांगितले की,मेंगडेवाडी येथील डिंभे उजव्या कालव्याजवळ विहीर खोदून साधारणतः तीन ते चार किलोमीटर लोखंडी पाईपची जलवाहिनी टाकण्यात आली होती.या जलवाहिनीतून गावाला पाणीपुरवठा चालू होता.दोन दिवसापूर्वी अज्ञात चोरट्यांनी दहा फुटांचे दहा लोखंडी पाईप कापून नेले. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. वर्षांपूर्वी अवसरी बुद्रुक (हिंगे वस्ती) रस्त्यावरील संरक्षक लोखंडी गार्ड चोरट्यांनी चोरून नेले होते.त्याचा अद्याप तपास लागला नसताना,जलवाहिनीचे पाईप चोरीला गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेली आठ दिवस या परिसरात रात्री ड्रोन गिरट्या घालत असल्याने ग्रामस्थ भयभीत झालेली आहेत.त्यातच हा चोरीचा प्रकार त्यामुळे ग्रामस्थांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

पाईप चोरीची व ड्रोनच्या गिरट्या यांची चौकशी करण्यात यावी अशी आग्रही मागणी सरपंच मच्छिंद्र शिवराम वाघ,उपसरपंच कैलास वाघ,भगवान वाघ, संकेत वायकर व येथील ग्रामस्थांनी केली आहे.

यासंदर्भात व इतर कामांसाठी ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज यांची घोडेगाव येथे भेट घेऊन चर्चा केली.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.