आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

गवार पिकाला मिळणाऱ्या चांगल्या बाजारभावामुळे उत्पादक शेतकरी आनंदी!!

गवार पिकाला मिळणाऱ्या चांगल्या बाजारभावामुळे उत्पादक शेतकरी आनंदी!!

प्रतिनिधी-समीर गोरडे

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात गवारीची लावगड झाली असुन गवार तोडणी योग्य झाली असुन सध्या गवारीला १० किलोला ५०० ते ९०० रुपये बाजार भाव मिळत असुन गवार उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात शिंगवे,पारगाव,रांजणी,वळती,भागडी, लाखणगाव, काठापूर,नागापुर या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गवारीचे पीक घेतले असुन काही शेतकऱ्यांची गवार तोंडणी चालू आहे. तर काहींची गवार तोंडणीला आली आहे. लागवडीनंतर ४० ते ४५ दिवसांत गवार तोंडणीला येते. तसेच सरासरी सात-आठ तोडे होतात. प्रामुख्याने हा भाग बागायती म्हणुन ओळखला जातो. त्यामुळे या परिसरातील शेतकरी तरकारी पिकाकडे मोठ्या प्रमाणत वळलेला दिसतो.

सध्या सर्वच शेतकऱ्यांच्या शेतात तरकारी पिकांची तोडणी सुरू आहे. सध्या तरकारी मालाला चांगला बाजारभाव मिळत असुन शिंगवे येथील शेतकरी मनोज ठका गोरडे यांनी वीस गुंठे क्षेत्रात निलम ६१ या वाणाची निवड करुन ऐन उन्हाळ्यात मे महिन्यांत गवार लावगड केली होती. गवारीचे पिके चांगले आले असुन नारायणगाव बाजार समीतीमध्ये गवारीच्या पहिल्याच तोडणीस ८० रूपये प्रति कीलो बाजार मिळाला तर दुसर्या तोडणीला ९० रूपये प्रती कीलो बाजार मिळाला.बाजारभाव टिकुन राहिले तर एक ते दिड लाख रुपये मिळतील असे शेतकरी मनोज गोरडे यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसापासून बिट, फ्लॉवर, गवार यासह सर्वच शेतीपिकाना चागला बाजारभाव असून यामुळे शेतकऱ्यांना चागले पैसे मिळत असल्याचे शेतकरी अरुण गोरडे, प्रवीण गोरडे, विनोद गोरडे, वैभव वाव्हळ, माऊली पाबळे यांनी सांगितले.

शिंगवे येथील गोरडे मळ्यात गवार तोडताना महिला शेतकरी.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.