आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

सावली सोशल सर्कल कडून स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण स्पर्धेचे आयोजन!!

सावली सोशल सर्कल कडून स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण स्पर्धेचे आयोजन!!

कोल्हापूर प्रतिनिधी: 8 जुलै 1910 या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मारलेली प्रसिद्ध मार्सेलिस उडी त्रिखंडात गाजली. या उडीने त्यावेळच्या महासत्तांना अचंबित केले. या जगप्रसिद्ध उडीच्या स्मरणार्थ सावली सोशल सर्कल गेल्या वर्षीपासून शालेय विद्यार्थ्यांकरता राज्यस्तरीय स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण चषक आयोजित करत आहे. या स्पर्धांना महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना आणि कोल्हापूर जिल्हा हौशी जलतरण संघटना यांनी मान्यता दिलेली आहे. यावर्षी संपूर्ण राज्यभरातून 280 स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला आहे. भोगावती महाविद्यालयाच्या परिसरातील राजर्षी शाहू जलतरण तलावावर या स्पर्धा संपन्न होत आहेत.

आज दिनांक 6 जुलै 2024 रोजी सकाळी साडेआठ वाजता या स्पर्धांचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला जलतरण संघटनेचे अध्यक्ष मा. आनंदराव माने हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते कोल्हापुरातील शिवछत्रपती पुरस्कार विजेते विजय जाधव, प्रफुल्ल जोशी, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. पाटील, प्रा. खराडे, संघटनेचे खजानिस अजय पाठक, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर फडणीस, ॲड. राजन देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या निमित्ताने स्वरदा फडणीस यांनी सावरकरांच्या जीवनावर लिहिलेल्या एका पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. ही पुस्तिका सर्व स्पर्धकांना वितरित करण्यात येणार आहे. जेणेकरून सर्व स्पर्धक शालेय मुलांना सावरकरांच्या जीवनाविषयी माहिती मिळू शकेल.

स्पर्धा ६ व ७ जुलै अशा दोन दिवस होतील. दिनांक ७ जुलै रोजी संध्याकाळी ४:३० वाजता स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण सोहळा संपन्न होईल.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.