आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

टाटा समूहाचे अध्यक्ष पद्मभूषण डॉ. एन चंद्रशेखरन यांची कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयाला भेट..

टाटा समूहाचे अध्यक्ष पद्मभूषण डॉ. एन चंद्रशेखरन यांची कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयाला भेट..

प्रतिनिधी -समीर गोरडे

राजगुरुनगर येथे कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय राजगुरुनगरच्या वतीने कांदा मूल्य साखळी व्यवस्थापन विषयावरती चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. चर्चासत्रासाठी टाटा समूहाचे अध्यक्ष डॉ. एन चंद्रशेखरन यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली.

चर्चासत्रामध्ये दापोली कृषी विद्यापीठाचे माजी कुलपती आणि संचालनालयाचे माजी संचालक डॉ. के. ई. लवांडे तसेच सह्याद्री ऍग्रो, नाशिकचे संस्थापक, विलास शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्य स्मार्ट प्रकल्पाचे नाशिक विभाग प्रमुख सुनील वानखेडे प्रगतशील कांदा शेतकरी, युवा उद्योजक, टाटा ग्रुप ऑफ कंपनीज विविध पदाधिकारी आणि संचालनालयाचे शास्त्रज्ञ उपस्थित होते.

चर्चासत्राची सुरुवात संचालनालयाचे संचालक डॉ. विजय महाजन सर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून तसेच संशोधन केंद्रामध्ये चाललेल्या विविध संशोधनांची आणि त्याद्वारे विकसित झालेल्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची माहिती देऊन केली. डॉ. लवांडे सरांनी आपल्या मनोगतामध्ये कांदा निर्यात आणि कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध प्रकारच्या उपाय योजनाबद्दल आढावा सादर केला.


प्रमुख पाहुणे पद्मभूषण डॉ चंद्रशेखरन यांनी कांदा लागवड, साठवणूक, विपणन, प्रक्रिया आणि कांदा प्रक्रिया उद्योगातील अडचणी तसेच या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी लागणाऱ्या उपाययोजना अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. तसेच टाटा समूहाच्या माध्यमातून भविष्यामध्ये यासाठी विविध उपाययोजना देखील करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. संचालनालयाच्या माध्यमातून सुरू असलेल्या संशोधन कार्याबद्दल त्यांनी समाधान देखील व्यक्त केले. सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे सर तसेच उपस्थित प्रगतशील युवा उद्योजक शेतकरी बांधवांनी देखील कांदा निर्यात आणि प्रक्रिया उद्योग वाढीची गरज आणि त्यासाठी त्यांना पाहिजे असणाऱ्या तंत्रज्ञानाची गरज याबद्दल त्यांचे विचार प्रगट केले.


प्रक्षेत्र दौरा भेटी दरम्यान संचालनालयाचे शास्त्रज्ञ डॉ. भूषण बिबवे आणि डॉ. राजकुमार दगडखेर यांनी संस्थेतील विविध प्रकारच्या कांदा साठवणगृह तसेच आधुनिक प्रकारचे कांदा साठवणुकीचे तंत्रज्ञान यांचे प्रात्यक्षिक आणि माहिती उपस्थिताना दिली. डॉ. बिबवे यांनी कांदा व लसूण संशोधन संचालनालय आणि टाटा स्टील प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या आधुनिक कांदा साठवणगृहच्या संशोधनाची माहिती उपस्थित मान्यवरांना दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजीव काळे यांनी केले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.