आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांदळेवाडी (ता.आंबेगाव) येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप!!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांदळेवाडी (ता.आंबेगाव) येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप!!

आंबेगाव तालुक्यातील मांदळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी, त्यांच्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढावी या हेतूने जिल्हा परिषद पुणे चे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांच्या प्रेरणेने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांदळेवाडी येथील विद्यार्थ्यांना दप्तर,टिफिन बॉक्स,पेन,पेन्सिल,वह्या,कंपास,पाणी बॉटल,लेखन पॅड आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक सखाराम मुंजाळ यांनी दिली.

यावेळी विद्यार्थ्यांसाठीच्या पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी उपसरपंच रवींद्र आदक यांनी बोरवेल खोदून मोटर व इतर आवश्यक असणारे साहित्य देण्याचे घोषित केले. सदर साहित्य दिनकर किसन आदक,विलास मच्छिंद्र आदक, पै.कैलास आदक, तुकाराम पालेकर,बापू शिवाजी आदक,चंद्रकांत आदक यांच्याकडून प्राप्त झाल्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

मांदळेवाडी हे आंबेगाव तालुक्यातील शेवटचे गाव आहे.या परिसरात पावसाचे प्रमाणही कमी राहत असल्याने पाण्याचे नियमित दुर्भिक्ष जाणवत असते. परंतु येथील ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावे व त्यांच्यामध्ये शाळेविषयी,शिक्षणाविषयी,ग्रामस्थांविषयी आपुलकीची भावना कायमस्वरूपी जतन व्हावी म्हणून शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आल्याचे उपस्थित ग्रामस्थांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील आदक जितेंद्र आदक,रामदास पालेकर,रवी ढगे,मुक्ता बंगे,बापू शिवाजी आदक,अतुल मांदळे, कुंडलिक आदक,रूपाली आदक,प्रियांका आदक,तानाजी आदक, विमल आदक आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक सखाराम मुंजाळ यांनी केले. सहशिक्षक बाळासाहेब लोखंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यक्रमाचे नियोजन सहशिक्षक शंकर पोंदे व सुजाता चिखले यांनी केले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.