आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

समर्थ पॉलिटेक्निक चा उत्कृष्ट निकाल!!तेजस खिलारी ९६ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम!!

१४९ विद्यार्थ्यांना ८० टक्के पेक्षा अधिक टक्के गुण!!!

समर्थ पॉलिटेक्निक चा उत्कृष्ट निकाल!!

तेजस खिलारी ९६ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम!!

१४९ विद्यार्थ्यांना ८० टक्के पेक्षा अधिक टक्के गुण!!!

समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट राजुरी संचलित समर्थ पॉलिटेक्निक या तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा निकाल सरासरी ९५ टक्के लागल्याची माहिती टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले व प्राचार्य अनिल कपिले यांनी दिली.महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळा मार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२४ चे निकाल नुकतेच जाहीर झाले.त्यात समर्थ च्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत संस्थेच्या यशस्वी वाटचालीत मोलाची भर घातली आहे.
शाखानिहाय निकाल पुढील प्रमाणे:

तृतीय वर्ष मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग
प्रथम क्रमांक:
तेजस खिलारी ९६%
द्वितीय क्रमांक:
निशांत बडे ९५.५%
तृतीय क्रमांक:
प्रतीक बेळे ९३.५ %

तृतीय वर्ष इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग
प्रथम क्रमांक:
कुणाल दंडवते ९३ %
द्वितीय क्रमांक:
विवेक शेंडकर- ८९.६३%
तृतीय क्रमांक:
रितेश पवार -८८.८८%

तृतीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग
प्रथम क्रमांक:
राजेश चव्हाण ९२.५६ %
द्वितीय क्रमांक:
प्रमोद गुंजाळ -९० %
तृतीय क्रमांक:
अनिकेत दिघे-८९.४४ %

तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
प्रथम क्रमांक:
सुशांत बढे-९०.९४ %
द्वितीय क्रमांक:
बाळकृष्ण दाते-९०.४७ %
तृतीय क्रमांक:
सिद्धी डुंबरे ८९.८८ %

तृतीय वर्ष सिव्हिल इंजिनीअरिंग
प्रथम क्रमांक:
तनुजा थोरात-८९.३३%
द्वितीय क्रमांक:
मयुरी आवारी ८४ %
तृतीय क्रमांक:
आदित्य उबाळे ८३.११%

तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनियरिंग
प्रथम क्रमांक:
प्रतीक भोर-८६.६३%
द्वितीय क्रमांक :
साक्षी ठुबे-८१.२०%
तृतीय क्रमांक:
सुमित गाडेकर-७९.३३%

प्रथम वर्षाचा निकाल ९९ टक्के त्याचप्रमाणे द्वितीय वर्ष ९० टक्के व तृतीय वर्षाचा निकाल ९६ टक्के लागला असल्याची माहिती प्रा.संजय कंधारे यांनी दिली.
महाविद्यालयातील १४९ विद्यार्थ्यांना ८० टक्के पेक्षा अधिक गुण मिळाल्याची माहिती टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले यांनी दिली.

त्याचप्रमाणे सानिका गायकर या विद्यार्थिनीला गणित या विषयामध्ये ७० पैकी ७० गुण मिळाले.सिद्धी डुंबरे या विद्यार्थिनीला इमर्जिंग ट्रेंड इन कॉम्प्युटर इंजिनियरिंग या विषयांमध्ये ७० पैकी ७० गुण मिळाले.तर राजेश चव्हाण या विद्यार्थ्याला इंडस्ट्रियल हायड्रोलिक अँड न्युमॅटिक,ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग,इंडस्ट्रियल इंजीनियरिंग अँड क्वालिटी कंट्रोल या विषयांमध्ये ७० पैकी ७० गुण मिळाले.

प्रमोद गुंजाळ व अनिकेत दिघे या दोन्हीही विद्यार्थ्यांना ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग या विषयांमध्ये ७० पैकी ७० गुण मिळाले.

या विद्यार्थ्यांना विभागप्रमुख प्रा.संजय कंधारे,मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागप्रमुख प्रा.महेंद्र खटाटे,मेकॅट्रॉनिक्स विभागप्रमुख प्रा.शाम फुलपगारे,कॉम्प्युटर विभागप्रमुख प्रा.स्वप्निल नवले,सिव्हिल विभागप्रमुख प्रा.संकेत विघे,इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग विभाग प्रमुख प्रा.आदिनाथ सातपुते,इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा.आशिष झाडोकर यांनी मार्गदर्शन केले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे,विभागप्रमुख व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले तसेच संकुलातील सर्व प्राचार्य,विभागप्रमुख,शिक्षक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.