आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

समर्थ संकुलातील ५७ विद्यार्थ्यांची एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड मध्ये निवड!!

समर्थ संकुलातील ५७ विद्यार्थ्यांची एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड मध्ये निवड!!

समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाच्या वतीने नुकतेच “कॅम्पस ड्राईव्ह २०२४” चे आयोजन करण्यात आले होते.
अहमदनर येथील एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या वतीने इंजिनियरिंग,डिप्लोमा आणि आयटीआय विद्यार्थ्यांच्या यावेळी मुलाखती घेण्यात आल्या. त्यामध्ये आयटीआय मधून ३५ विद्यार्थी, पॉलिटेक्निक मधील १५ तर इंजिनिअरिंगच्या ७ याप्रमाणे एकूण ५७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
विद्यार्थ्यांना विषयाबाबतचे असलेले सखोल ज्ञान,भाषण कौशल्य,सॉफ्ट स्किल,कलचाचणी या बाबीचा विचार करून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आल्याची माहिती सिनियर असिस्टंट मॅनेजर दत्तात्रय बाचकर यांनी दिली.
निवड झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे:-

इंजिनिअरिंग विभाग:
मेकॅनिकल इंजिनिअरिंग:
सिद्धार्थ गायखे,प्रसाद घोलप सुरज खरडे.
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग:
आदित्य कापसे,आकाश शेटे.

पॉलिटेक्निक विभाग:
इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंग:
प्रतीक भोर,करण डोके,आर्यन वायकर,वैभव आहेर,आदित्य टेमकर,प्रदीप तागड.

मेकॅनिकल इंजिनिअरिंग:
आदिनाथ भिंडे.
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि:
पुरुषोत्तम बनकर,श्रेयश बढे,अमीर पठाण,प्रणव निघोट,मयूर जाधव.

मेकॅट्रॉनिक्स :-
साहिल मणियार,प्रतीक बेले,ओमकार घुले.

आय टी आय विभाग:
ड्राफ्ट्समन मेकॅनिक:
केतन थोरात,प्रशांत घोलप,प्रतीक पानमंद,राहुल कुऱ्हाडे,तेजस फापाळे,ऋषिकेश डावकर,सौरभ खरटमल,सादिक शेख,आदित्य हांडे,ओंकार मोरे.

इलेक्ट्रिशियन:
अथर्व दाते,आर्यन विश्वासराव,रोहन भाकरे,सचिन चतुर,आयुष वाघुले.

डिझेल मेकॅनिक:
विश्वास माने,आकाश वायदांडे,शोएब पटेल,सिद्धनाथ गोरडे,रोहित दांगट,किरण मुंजाल,आदित्य साळी.

फिटर:
हर्षद वाडेकर

मेकॅनिक मोटर व्हेईकल:
अविष्कार सोनवणे,समर्थ दाते,अक्षय रोडे,आदित्य जाधव,सागर गुंजाळ,गणेश राऊत.

डिप्लोमा कोर्स इन इलेक्ट्रिशियन: ओम फापाळे,उत्कर्ष औटी,आकाश कणसे,धीरज औटी.

सदर निवड प्रक्रिया दत्तात्रय बाचकर (सीनियर असिस्टंट मॅनेजर), बापू जाधव(जूनियर ऑफिसर), प्रतीक्षा वाघमारे(रिक्रुटर) पूजा मॅडम(ट्रेनिं) यांनी पूर्ण केली.सदर प्लेसमेंट ड्राईव्ह पूर्ण करण्यासाठी आयटीआयचे विष्णू मापारी,प्रा.संजय कंधारे,प्रा.अमोल खातोडे,ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा.संकेत विघे,मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा.महेंद्र खटाटे,अभियांत्रिकी इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग प्रमुख प्रा.आशिष झाडोकार,इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग प्रमुख प्रा.आदिनाथ सातपुते,मेकॅट्रॉनिक्स विभाग प्रमुख प्रा.श्याम फुलपगारे,प्रा.हुसेन मोमीन,प्रा.प्रकाश डावखर,प्रा.माधवी भोर,प्रा.प्रणाली थोरात,प्रशांत औटी आदींनी परिश्रम घेतले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,पॉलिटेक्निकचे प्राचार्य अनिल कपिले,अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.सतीश गुजर,आय टी आय चे प्राचार्य पांडुरंग हाडवळे,टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.