आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

गरिब गरुजु मुलांच्या स्वप्नांना जिजाऊने दिला आधार!!

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेने ठाण्यात सुरु केल्या 21 मोफत अभ्यासिका!!

गरिब गरुजु मुलांच्या स्वप्नांना जिजाऊने दिला आधार!!

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेने ठाण्यात सुरु केल्या 21 मोफत अभ्यासिका!!

ठाणे : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्यावतीने ठाणे शहर विभाग अंतर्गत गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने मोफत अभ्यासिका विविध ठिकाणी चालवल्या जात आहेत.

ठाणे येथील येऊर या ठिकाणी तसेच ठाणे येथील कोपरी परिसरात असणार्‍या कचर्‍याच्या भल्यामोठ्या डोंगराच्या पायथ्याशी दुर्गावाडी या नावाने कचरा वेचकांची वस्ती वसलेली या ठिकाणी देखील ही मोफत अभ्यासिका चालवली जाते. ठाण्यात या आधीच संस्थेच्या एकूण 11 ठिकाणी अभ्यासिका चालू करण्यात आल्या होत्या. अशाच प्रकारच्या 21 मोफत अभ्यासिका यावर्षी देखील ठाणे शहरात विविध ठिकाणी चालू करण्यात येणार आहेत. जिजाऊ परिवारातील सदस्य काश्वी पडवळे हिच्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ संस्था हा स्तुत्य उपक्रम राबवत असल्याची माहिती जिजाऊ संस्थेच्या वतीने देण्यात आली.

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था गेली 15 वर्ष शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला सक्षमीकरण आणि शेती या मुद्यांवर ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात कार्य करत आहे. जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे हे कोणाकडून कसलीही देणगी न घेता स्व:खर्चाने संस्थेचे सर्व उपक्रम समाजासाठी अगदी मोफत राबवत आहेत. मोफत अभ्यासिका हा जिजाऊ संस्थेच्या अनेक उपक्रमांपैकीच एक उपक्रम असून ठाणे शहरातील सर्व झोपडपट्टी विभागात राहणार्‍या गरीब विद्यार्थ्यांसाठी इयत्ता पहिली ते दहावीच्या अभ्यासाचा जास्तीत जास्त सराव करून घेऊन व त्यांना उत्तम शिक्षण देण्यासाठी, त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी यासाठी संस्थेच्यावतीने प्रयत्न केले जातात. या वस्तीत असणार्‍या कुटुंबातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी करिअर मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास तसेच भविष्यात होणार्‍या शालेय स्तरीय व पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी होणार्‍या स्पर्धा परीक्षांचे योग्य मार्गदर्शन मिळावे आणि आतापासून आवश्यक त्या तयारीला विद्यार्थ्यांनी सुरवात करावी त्यांची गुणवत्ता वाढीस लागावी जेणेकरून ही आर्थिक दुर्बल, दुर्लक्षित घटकातील विद्यार्थी या स्पर्धेच्या युगात मागे पडणार नाही या हेतूने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था विविध शैक्षणिक उपक्रमही राबवत आहे.


जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे तसेच संस्थेचे संपूर्ण सहकारी अगदी तळमळीने या मुलांचे भवितव्य घडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून अनेक मुलांच्या उज्वल भविष्याच्या आशा नव्याने पल्लवीत झाल्या आहेत. यांसह इतर अनेक मुलांच्या शिक्षणाची पाऊलवाट जिजाऊ संस्था सुखकर करत आहे. इथे दहावीपर्यंतचे शिक्षण देऊन पुढील शिक्षणासाठी होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना संस्थेच्या पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात असलेल्या झडपोली येथील सीबीएसई शाळेत नेण्याचे नियोजन देखील संस्थेच्या वतीने चालू आहेत.

स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून त्यांना भविष्यात अधिकारी बनवण्याचे संस्थेचे स्वप्न आहे .
कचर्‍यावरच्या शाळेतल्या होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना जेईई-नीट व इतर स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून एक चांगल्या करिअरचा ग्राफ निर्माण करण्यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत . या आधी मागील वर्षी संस्थेच्या वतीने ठाण्यातील डम्पिंग ग्राऊंड, महात्मा फुले नगर, परेरा नगर, भीम नगर, येऊर, कौसा मुंब्रा, दिवा, इंदिरानगर, भोला नगर अश्या 11 ठिकाणी अभ्यासिका चालू करण्यात आल्या होत्या. तर यावर्षी 21 अभ्यासिका नव्याने ठाणे शहरात सुरु होत आहेत. झोपडपट्टीत राहणार्‍या विद्यार्थ्यांना सर्वार्थाने सक्षम करण्याचा ध्यास जिजाऊ संस्थेने घेतला आहे.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.