आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

शिरदाळे येथे औद्योगिक प्रकल्प व्हावा यासाठी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन!!

शिरदाळे येथे औद्योगिक प्रकल्प व्हावा यासाठी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन!!

शिरदाळे ता,आंबेगाव हे गाव आंबेगाव तालुक्यातील शेवटचे टोक आणि डोंगरावर वसलेले छोटेशे खेडेगाव. इतर गावांच्या तुलनेत या ठिकाणी डोंगर भाग जास्त असल्याने या ठिकाणी शेतीचे पाणी जाण्यास अडचणी आहेत.शिवाय कायम दुष्काळी भाग असल्याने फक्त दोनच शेतीची पिके घेऊन हा शेतकरी आपलं समाधान मानत असतो. परंतु बदलत्या काळानुसार या गावात देखील काहीतरी औद्योगिक प्रकल्प,सौरऊर्जा प्रकल्प,किंव्हा इतर काहीतरी उद्योग व्यवसाय फक्त त्यात खडी क्रॅशरचा समावेश नसावा असा काही तरी प्रकल्प राबवावा असे निवेदन ग्रामपंचायतच्या वतीने आणि पुणे जिल्हा परिषद मा.उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मा.सरपंच मनोज तांबे,मा.उपसरपंच मयुर सरडे,तसेच अक्षय तांबे यांनी सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांना दिले. यामध्ये इतर गावातील विकास कामांचा देखील उल्लेख करण्यात आला आहे.

शिरदाळे सारख्या भागात जर काही औद्योगिक प्रकल्प उभा राहिला तर नक्कीच याचा फायदा आसपासच्या गावांना देखील होणार असून यामुळे स्थानिक रोजगार देखील उपलब्द होऊ शकतात त्यामुळे साहेबांनी यावर नक्की विचार करावा आणि आमच्या गावातील ग्रामस्थांना चांगले दिवस पाहण्याची संधी द्यावी असे मा.उपसरपंच मयुर सरडे यांनी सांगितले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.