आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

के.के. वाघ विद्याभवनाच्या भव्य मैदानावर योग दिन उत्साहात!!

के.के. वाघ विद्याभवनाच्या भव्य मैदानावर योग दिन उत्साहात!!

निफाड .ता-२१ कर्मवीर काकासाहेब वाघ विद्याभवन भाऊसाहेबनगर येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा झाला.व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्याभवनाचे प्राचार्य अशोक बस्ते,तर प्रमुख अतिथी यशवंत ढगे,योग गुरु मधुकरजी आवारे, ज्ञानेश्वर टर्ले ,क्रीडाविभाग प्रमुख गोविंद कांदळकर उपस्थित होते.प्रसंगी योगगुरू मधुकरजी आवरे यांनी विद्यार्थ्यांना योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवत सर्व विद्यार्थ्यांकडून व शिक्षकांकडून आसने करून घेतली.

त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्याभवनाचे प्राचार्य अशोक बस्ते यांनी विद्यार्थ्यांसमवेत सर्व योग क्रिया करत विद्यार्थ्यांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन , प्रास्ताविक ,आभार प्रदर्शन क्रीडा विभाग प्रमुख गोविंद कांदळकर यांनी केले.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी एन सी सी प्रमुख डी के मोरे सह एन सी सी ,स्काऊट ,हरितसेना या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

योगासने करतांना प्राचार्य अशोक बस्ते,
समन्वयक यशवंत ढगे ,विदयार्थी आदी..

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.