आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

सडोली दु शाळेत योग दिन उत्साहात साजरा!!

सडोली दु शाळेत योग दिन उत्साहात साजरा!!

कोल्हापूर प्रतिनिधी- सडोली दु (ता.करवीर) या शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. पाऊस असल्याने पटांगणावर योगासने न घेता शाळेच्या व्हरांड्यात घेण्यात आली. सर्व मुले योगासाठी आवश्यक ड्रेस मध्ये व चटई घेऊन आली होती. योगगुरू सुरेखा नलवडे यांनी योग साधना घेतली. यामध्ये प्रार्थना, पूरक हालचाली, अनुलोम विलोम, प्राणायाम, कपालभाती, भ्रामरी, ताडासन, वज्रासन, बकासन, मयुरासन, त्रिकोणासन, शवासन अशी विविध आसने घेतली.


यावेळी, पूरक आहार विहार याविषयी अध्यापक महादेव खोंद्रे यांनी माहिती सांगितली.
या उपक्रमात मुख्याध्यापक एकनाथ कुंभार, एम आर कांबळे, चंद्रकांत थोरवत, विठाबाई कांबळे, अश्विनी पोवार, योगिता निकम यांनी सहभाग घेतला.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.