आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आत्मा मालिक इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थीचा शाळेच्या प्रथम दिवशी उत्साहात स्वागत!!

आत्मा मालिक इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थीचा शाळेच्या प्रथम दिवशी उत्साहात स्वागत!!

शहापूर तालुक्यातील मोहिली – अघई येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट (कोकमठाण) संचलित, आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल शाखा मोहिली – अघई, ता शहापूर, जि. ठाणे येथे आत्मा मालिक माउलींच्या कृपाशीर्वादाने, संत परिवाराच्या प्रेरणेने, संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी साहेब, समस्त विश्वस्त मंडळ व स्थानिक व्यवस्थापन समिती कार्याध्यक्ष उमेशजी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाने आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात आत्मा मालिक इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थीचा शाळेच्या प्रथम दिवशी उत्साहात स्वागत करण्यात आले.


याकार्यक्रमासाठी संकुलाचे कार्याध्यक्ष तथा विश्वस्त उमेश जाधव साहेब,आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य कैलास थोरात ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य पंकज बडगुजर व वसतिगृह प्रशासकीय अधिकारी सचिन सकट शरद ब्राह्मणे आदीसह संकुलाचे पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.


विद्यार्थ्यांचे संकुलात आगमन होताच त्यांचे स्वागत करण्यात आले.प्राचार्य कैलास थोरात सर यांनी नवीन शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शिक्षिकांनी सभागृहात बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना औक्षण करून त्यांंचे स्वागत केले.
यावेळी स्वरांजली ग्रुपने स्वागत गीत गाऊन सर्वांचे शब्दसुमनांनी स्वागत केले.


त्यानंतर शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ साठी प्रवेशित झालेल्या सर्व खाजगी विद्यार्थ्यांचा परिचय सोहळा संपन्न झाला. यावेळी नवीन शिक्षकांनी आपापला परिचय विद्यार्थ्यांना करून दिला.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रद्धा सानप मँडम यांनी केले. सन २०२३- २४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीचा शंभर टक्के निकाल लागल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.इ.१ली ते इ.१०वीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य,वर्गशिक्षकांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या गुणगौरव समारंभाचे सूत्रसंचालन सोमनाथ कांबळे सर यांनी केले.


NCC च्या २५ यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून प्राचार्य थोरात सर व वसतिगृह प्रशासकीय अधिकारी सचिन सकट सर यांनी त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले व एन.एन.सी प्रशिक्षक अक्षय बरकले यांचे अभिनंदन करण्यात आले.


याकार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख मोहन साबळे व आभारप्रदर्शन अशोक शेलार यांनी केले. कार्यक्रमाची समारोप स्वरांजली ग्रूपचे विभागप्रमुख व संगीतविशारद सुयोग खंडागळे, लक्ष्मण साळुंखे संगीताने तसेच अमृतवाणी करण्यात आली.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.