आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी (जारकरवाडी) येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा!!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी (जारकरवाडी) येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा!!

आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडीच्या ढोबळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सहशिक्षिका सौ.वैजयंता विजय थोरात यांनी विद्यार्थ्यांकडून मुक्त हालचालींचा सराव करून घेतला व विद्यार्थ्यांना योगासनामधील विविध असणे करून दाखवली व ती विद्यार्थ्यांकडून करून घेतली.

योग शरीर आणि मन एकत्र आणतो आणि तीन मुख्य घटकांवर आधारित आहे – हालचाल, श्वास आणि ध्यान. योगासने सुधारित मुद्रा, लवचिकता, सामर्थ्य, संतुलन आणि शरीर जागरूकता यासह अनेक शारीरिक आणि मानसिक आरोग्य फायदे आहेत.योगाची व्याख्या कृतींचा सराव म्हणून केली जाऊ शकते ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या चेतनेचे मिलन होते.आपल्या मनाची, शरीराची आणि श्वासाची काळजी घेणे अशी योगाची व्याख्या करता येते. हे सर्व शरीराला मनाच्या स्थितीशी सुसंवाद साधण्यासाठी आहे. आत्मसाक्षात्कार प्राप्त करणे हे योगाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय एकनाथ थोरात यांनी पंचनामाशी बोलताना सांगितले.

या आसनांचा रोज घरी सराव करण्याचा संकल्प शाळेचे मुख्याध्यापक श्री.विजय एकनाथ थोरात यांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतला.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.