आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीसामाजिक

आंबेगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये नंदी बैलाचे आगमन!!

आंबेगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये नंदी बैलाचे आगमन!!

आंबेगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये नंदी बैलाचे आगमन झाले आहे. दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी नंदिबैलाचे या परिसरात आगमन होत असते.

सदरचे नंदिबैलावाले हे बारामती येथील मेडद गावाचे रहिवासी असुन वंश परंपरागत पद्धतीने हा व्यवसाय त्यांनी जपला असल्याचे ते सांगतात. काळ बदलतो आहे तसाच काळासोबत समाजही बदलत आहे.

बदलत्या काळानुसार जुन्या,रूढी, परंपरा देखील लोक पावत चालल्या आहेत. मात्र या रूढी-परंपरा जपणे ही आपणा सर्वांची जबाबदारी असून समृद्ध भारताची संस्कृती दाखवणाऱ्या या रूढी परंपरा आहेत त्या जपल्या गेल्या पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी पंचनामाशी बोलताना व्यक्त केली.

आमच्या कुटुंबातील मुले देखील शैक्षणिक प्रवाहात आल्याने त्यांच्या या व्यवसायाकडे असणारा कल कमी झाला आहे. आमच्या कुटुंबातील बहुतांशी मुले ही सुशिक्षित झाली आहेत.चांगल्या हुद्द्यावरती नोकरीत आहेत.जोपर्यंत आम्ही हयात आहोत तोपर्यंत ही कला जपण्याचे आणि जोपासण्याचे काम आम्ही प्रामाणिकपणे करणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.