आरोग्य व शिक्षणसामाजिक

श्री शिवाजीराव आढळराव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेला स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद!!

स्पर्धेत तब्बल १८०० स्पर्धकांचा सहभाग!!

श्री शिवाजीराव आढळराव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेला स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद!!

स्पर्धेत तब्बल १८०० स्पर्धकांचा सहभाग!!

शिवसेना उपनेते,मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली,महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मंचर येथे श्री.शिवाजीराव आढळराव पाटील प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री प्रभु रामचंद्र मॅरेथॉन स्पर्धेला स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद लाभला. तब्बल १८०० स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.सागर काजळे यांनी दिली.

व्यायाम हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सुदृढ मन व शरीर कोणत्याच आजाराला बळी पडत नाही. म्हणून सर्वांनी व्यायाम करणे गरजेचे आहे.आजच्या स्पर्धेला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता, आगामी काळात अशा प्रकारच्या विविध स्पर्धा आयोजित केल्या जाणार असल्याचे प्रतिपादन मा.खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या वेळी केले.

12 वर्षाखालील गटात (मुले) प्रथम क्रमांक – प्रदीप प्रकाश पोगाके, द्वितीय क्रमांक – शंभुराजे योगेश बाणखेले, तृतीय क्रमांक – आर्यन राजेंद्र शिंदे, चतुर्थ क्रमांक – सुजल प्रफुल्ल दरेकर, पाचवा क्रमांक – कृणाल निघोट तर मुलींमध्ये प्रथम क्रमांक – स्वरा बेंडे, द्वितीय क्रमांक – आदीती भड, तृतीय क्रमांक – सई कराळे, चतुर्थ क्रमांक तृप्ती जयराम लबडे, पाचवा क्रमांक – कृष्णा सुनिल आचार्य यांनी पटकावला.

12 ते 16 या वयोगटात (मुले) प्रथम क्रमांक – किशोर सुरेश पाटील, द्वितीय क्रमांक – प्रणव कैलास निंबाळकर, तृतीय क्रमांक – अभिषेक चंद्रकांत गूळभिले, चतुर्थ क्रमांक – आर्यन वसंत लवटे, पाचवा क्रमांक – साहिल संजय शिंदे तर मुलींमध्ये प्रथम क्रमांक – सृष्टी तुषार लोंढे, द्वितीय क्रमांक – ज्ञानेश्वरी लामखडे, तृतीय क्रमांक – शौर्या नवनाथ उदावांत, चतुर्थ क्रमांक – नेहा दिपक कपाळे, पाचवा क्रमांक – आर्या मनोज डोके यांनी पटकावला.

खुल्या गटात (मुले) प्रथम क्रमांक-सतिश विलास सरगर, द्वितीय क्रमांक-नवनाथ तानाजी वायकर, तृतीय क्रमांक- सुरेश गोपीनाथ देसाई, चतुर्थ क्रमांक – संजय दिपक गौडगुंडा , पाचवा क्रमांक – सूरज दत्तात्रय भोर यांनी पटकावला.खुल्या गटात (मुली) प्रथम क्रमांक- भाग्यश्री भास्कर भंडारी, द्वितीय क्रमांक-तनुजा आतकर, तृतीय क्रमांक- निकिता शांताराम भोर, चतुर्थ क्रमांक – ज्ञानेश्वरी बबन शिंदे, पाचवा क्रमांक – सानिका रामदास वळे यांनी पटकावला.

या स्पर्धेत 12 वर्षाखालील मुले-मुली यांसाठी 3 कि.मी, वयोगट 13 ते 16 मुले-मुली 5 की.मी,खुला गट 10 कि.मी. असे अंतर निर्धारित करण्यात आले होते. वयोगटानुसार विजेत्या स्पर्धकांना प्रथम क्रमांकासाठी 4,100/- द्वितीय क्रमांकासाठी वयोगटानुसार 3,100/- तृतीय क्रमांकासाठी 2,100/- चतुर्थ क्रमांक 1,100/- पाचवा क्रमांक 700/- अशा स्वरुपात रोख बक्षिसे व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले.

या प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुनिल बाणखेले, शिवसेना तालुकाप्रमूख अरुण गीरे, तालुका प्रमुख संतोष डोके,उपतालुका प्रमुख अशोक थोरात,लहूजी साळवे स्मारक उपाध्यक्ष शिवाजी राजगुरु, मंचर पोलीस स्टेशनचे निरीक्षक शेखर शेटे ,भैरवनाथ पतसंस्था संचालक अशोक गव्हाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश खरमाळे, शिवसेना महिला आघाडी मालती थोरात,शहर प्रमूख रामदास जाधव,मा.उपसरपंच धनेश मोरडे,मा.सदस्य सतिश बाणखेले,सविता क्षिरसागर,संजीव थोरात,राम थोरात-भक्ते, सुशांत रोकडे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलंकार बाणखेले,मिथुन पांचाळ, सीमा काळे यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आयोजक योगेश बाणखेले यांनी आभार मानले.देवा मटाले सर,बाळासाहेब खानदेश सर,प्रथमेश निघोट सर व न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी सेवक वृंदाचे विशेष सहकार्य लाभले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.