ताज्या घडामोडीसामाजिक

धामणी(ता.आंबेगाव) येथे संपन्न झाली खंडोबाच्या नवीन पालखीची मिरवणूक!!

धामणी(ता.आंबेगाव) येथे संपन्न झाली खंडोबाच्या नवीन पालखीची मिरवणूक!!

धामणी (ता.आंबेगाव) येथे धर्मनाथ बिजेला (रविवारी) कुलस्वामी श्री म्हाळसाकांत खंडोबाच्या पंचधातूच्या मुखवट्याची,लोकवर्गणीतून नवीन करण्यात आलेल्या पितळी पालखीतून वाजतगाजत सदानंदाचा येळकोटच्या जयघोषात व फटाक्याच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली.

मागील वर्षीच्या (२३नोव्हे.२०२३) सोमवतीच्या सोहळ्यात खंडोबाच्या मानाच्या काठीच्या व पालखीच्या मानकर्‍यांनी खंडोबाची नवीन पालखी करण्याची ग्रामस्थांना विंनती केलेली होती. त्यावेळी देवस्थानाने व सेवेकरी मंडळीनी नवीन पालखी माही पुनवेच्या यात्रेच्या अगोदर तयार करणार असल्याचे भाविकांना सोमवतीला जाहीर केलेले होते.

माघ महिण्यातील शुक्ल पक्ष द्बितीया, धर्मनाथबीजेच्या मूहर्तावर सकाळीच खंडोबा देवस्थानाचे सेवेकरी भगतवाघे वीर मंडळीनी खंडोबाचा मुखवटा पालखीत ठेवल्यानंतर नवीन पालखीची मारुती देऊळाच्या ओट्यावर धामणीच्या सरपंच रेश्मा बोर्‍हाडे व अजित बोर्‍हाडे यांच्या हस्ते पूजा करुन पालखीच्या मिरवणूकीला सुरुवात करण्यात आली.पालखीची फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आलेली होती. धामणी व लोणी येथील पंचरास मंडळीच्या पारंपारिक ताफ्यातील हालगी,ढोलकी,सनई,संबळ,तुतारी, ताशाच्या निनादात मिरवणूकीत मोठ्या संख्येने ग्रामस्थ व भाविक सहभागी झालेले होते.

पेठेत ठिकठिकाणी महिला भाविकांनी नवीन पालखीची ओवाळणी करून पालखीचे दर्शन घेतले. नवीन पालखी मजबूत व आकर्षक झाली असल्याचे भाविक व ग्रामस्थ पालखीचे दर्शन घेताना सांगत होते.त्यानंतर नवीन पालखीसह मिरवणूक मंदिरात पोहोचल्यानंतर पालखीची परंपरागत सेवेकरी भगत,तांबे,वाघे,वीर मंडळीनी पारंपारिक पूजा केल्यानतर आरती करण्यात आली.

यावेळी पालखीचे सेवेकरी मुख्य पुजारी दादाभाऊ भगत,प्रभाकर भगत,शांताराम भगत,धोंडीबा भगत,सिताराम जाधव वाघे,दिनेश जाधव,सुरेश पवार,कैलास रोकडे,पांडुरंग भगत व वाजंत्री मंडळी यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी यात्रा कमेटीचे अध्यक्ष गजाराम पाटील,देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश पाटील जाधव,पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले,सरपंच रेश्मा बोर्‍हाडे,दादाभाऊ भगत,सुभाष तांंबे.प्रा. अशोक पगारीया,ज्ञानेश्वरमाऊली विधाटे,कोंडीबा तांबे,सुभाष सोनवणे,पहाडदर्‍याचे सरपंच मच्छिंद्र वाघ,कैलास वाघ,कांतीलाल तांबे,मनोज तांबे,राहूल करंजखेले,अजित बोर्‍हाडे,माजी सरपंच सागर जाधव,वामनराव जाधव,उत्तम जाधव,अविनाश बढेकर,विठ्ठल बढेकर,महिपत बढेकर,बाळासाहेब लालजी बढेकर,प्रभाकर भगत,धोंडीबा भगत,गणेश भुमकर,सरपंच बाळासाहेब विधाटे,रमेश जाधव,सुनिल हनुमंत जाधव,अक्षय विधाटे,किसनराव रोडे,गणपत हरी विधाटे व ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.